महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

MS Dhoni : महेंद्र सिंग धोनी प्रॉडक्शनच्या लेट्स गेट मॅरीड चित्रपटाचा टीझर रिलीज

'एलजीएम लेट्स गेट मॅरीड' या तमिळ चित्रपटातून धोनी निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा पहिला अधिकृत टीझर हा प्रदर्शित झाला आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत निर्मित झाला आहे.

LGM  Let's Get Married
एलजीएम लेट्स गेट मॅरीड

By

Published : Jun 8, 2023, 3:02 PM IST

मुंबई : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. धोनीने दाक्षिणात्य सिनेमाची निर्मिती केली आहे. धोनीचा 'एलजीएम लेट्स गेट मॅरिड' हा एक तमिळ सिनेमा आहे. शिवाय त्याने आणि त्याची पत्नी साक्षीने बुधवारी या सिनेमाचा टीझर देखील रिलीज केला आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार 'एलएसजी लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'लव्ह टुडे' या सिनेमाच्या माध्यमातून इवानाला लोकप्रियता मिळाली होती. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यामुळे आता इवाना हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर किती कमाल करणार हे काही दिवसानंतरच कळेल. दरम्यान या सिनेमाचे दिग्दर्शन हे रमेश थमिलमनी केले आहे. तसेच धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे.

धोनीचा चित्रपट :मीडिया रिपोर्टनुसार धोनी एन्टरटेन्मेंट कंपनीचा हा एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. एमएस धोनीने त्याच्या फेसबुक पेजवर ट्रेलर पोस्ट शेअर करत म्हटले, 'एलजीएम लेट्स गेट मॅरिड' चित्रपटगृहांमध्ये टीझर रिलीज करताना मला खूप आनंद झाला आहे आणि अभिमान आहे! टीममधील मला सर्वांनी शुभेच्छा दिल्या!' धोनीच्या कॉलिवूडमध्ये आगमनाची औपचारिक घोषणा ही गेल्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती. आता धोनीची नवीन कारकीर्द कोणत्या दिशेने चालली आहे हे स्पष्ट झाले आहे. महेंद्र सिंह धोनीचा हा पहिल्या सिनेमा अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. हा कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट एक कपल आणि आई यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर आधारित असणार आहे.

आतापर्यंत ३ लघुपट धोनी प्रोडक्शन हाऊसने बनविले :धोनीने क्रिकेटविश्वात आपल्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. आता सिनेसृष्टीत झळकण्यासाठी तो सज्ज झाला आहे. धोनी एंटरटेनमेंट कंपनी जानेवारी २०१९ मध्ये सुरू झाली आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसने आतापर्यंत ३ लघुपट बनवले आहेत धोनीच्या या नव्या सिनेमाची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. Naga Chaitanya : नागा चैतन्य स्टारर 'कस्टडी' हा चित्रपट ओटीटीवर 'या' तारखेला होणार प्रदर्शित...
  2. The Broken News season 2 : द ब्रोकन न्यूज सीझन २ चा टीझर रिलीज, माध्यमांचे पितळ उघडं पाडणारा थ्रिलर
  3. ZHZB Collection Day 6 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या कमाईवर सर्वांचे लक्ष...

ABOUT THE AUTHOR

...view details