महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Lav Ranjan reveals : त्याच्या चित्रपटात महिला खलनायक का असतात, दिग्दर्शक लव रंजनचा खुलासा - Ranbir Kapoor and Shraddha Kapoor

लव रंजनच्या चित्रपटात नेहमी महिला खलनायक असतात. याबाबतचा खुलासा त्याने केला आहे. त्याच्या आगामी तू झुठी में मक्कार या आगामी चित्रपटातही हा सिलसिला जारी आहे. याबद्दलचा खुलासा स्वतः लव रंजननेच केला आहे.

दिग्दर्शक लव रंजनचा खुलासा
दिग्दर्शक लव रंजनचा खुलासा

By

Published : Jan 23, 2023, 4:55 PM IST

मुंबई - दिग्दर्शक लव रंजन, त्याच्या आगामी थिएटरीयल रॉम-कॉम, तू झुठी में मक्कार या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे, त्याने शेवटी आपले मौन सोडले असून त्याच्या चित्रपटात नेहमी महिलाच खलनायक का असतात यावर आपले मत व्यक्त केलंय.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य जोडी असलेला हा चित्रपट, दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. हा रंजनचा त्याच्या शेवटच्या दिग्दर्शनाच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' नंतरच्या पाच वर्षांतील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री नुश्रत भरुच्चा हीदेखील खलनायकाच्य़ा भूमिकेत होती.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिग्दर्शक लव रंजन म्हणाला, और भी फिल्ममेकर्स हैं जो 'लडकी सीधी है लडका चालू है' के स्पेस में अच्छे फिल्म्स बना रहे हैं. एक चित्रपट निर्माता म्हणून मला माझ्या चित्रपटांमध्ये आणि माझ्या प्रेक्षकांसाठी एक विशिष्ट नवीनता असणे आवश्यक आहे.

तो पुढे म्हणाला, फिल्म में जब तक एक निगेटिव्ह और एक पॉझिटिव्ह फोर्स ना हो तब तक फिल्म प्रेक्षक को एंगेज नही करेगी, माझ्या चित्रपटांमध्ये एक स्त्री नकारात्मक भूमिका साकारणे हा निव्वळ सर्जनशील निर्णय आहे.

रणबीरच्या रोम-कॉमच्या शैलीत पुनरागमन करणाऱ्या 'तू झूठी मैं मक्कार'मध्ये स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी देखील आहे. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आणि टी-सीरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांनी सादर केलेला हा चित्रपट पाहण्याबाबतची उत्सुकता चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. रणबीर आणि श्रद्धाची केमिस्ट्री इंटरेस्टिंग दिसतेय. या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही पण तू झुठी मैं मक्कारचा ट्रेलर पाहता असे दिसते आहे की त्यांनी चित्रपटावर काम करताना चांगला वेळ घालवला आहे आणि चित्रपटाच्या झलकांमध्ये त्याचा उत्तम परिणाम दिसत आहे. ट्रेलर लव रंजनच्या चित्रपटाच्या मजेशीर दुनियेत डोकावून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. झुठीच्या भूमिकेतील आकर्षक श्रध्दा आणि मक्कार रणबीर यांनी आपल्या पात्रांना न्याय देण्याच केलेला प्रयत्न जाणवत आहे.

हा चित्रपट रणबीर आणि श्रद्धा यांचा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट आहे. TJMM हा वर्षातील अत्यंत अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे कारण याला अनेक वेळा विलंब झाला आहे. हा चित्रपट शेवटी 8 मार्च 2023 रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

हेही वाचा -Tu Jhoothi Main Makkaar trailer: रणबीर आणि श्रध्दाचा तू झुठी में मक्कारचा ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details