महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कुत्ते' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज, खणखणीत डायलॉगसह 'एक हड्डी सात कुत्ते' - Kute motion poster

लव रंजन आणि विशाल भारद्वाज यांचा आगामी कुत्ते चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. या मोशन पोस्टरची सुरुवात 'एक हड्डी सात कुत्ते' या वाक्यापासून होते. त्यानंतर एक एक व्यक्तीरेखा दिसायला लागतात आणि बॅकग्राऊंडमध्ये त्यांचे डायलॉग ऐकू येतात.

'कुत्ते' चित्रपटाचे मोशन पोस्टर
'कुत्ते' चित्रपटाचे मोशन पोस्टर

By

Published : Dec 16, 2022, 5:16 PM IST

मुंबई - लव रंजन आणि विशाल भारद्वाज यांचा आगामी 'कुत्ते' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे आकर्षक आणि लक्ष वेधून घेणारे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''लव रंजन - विशाल भारद्वाज: 'कुत्ते' मोशन पोस्टर बाहेर पडले. अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज यांची भूमिका असलेल्या कुत्तेचे मोशन पोस्टर, विशाल भारद्वाजचा मुलगा आस्मान भारद्वाजचे दिग्दर्शनात पदार्पण.''

या मोशन पोस्टरची सुरुवात 'एक हड्डी सात कुत्ते' या वाक्यापासून होते. त्यानंतर एक एक व्यक्तीरेखा दिसायला लागतात आणि बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा डायलॉग ऐकू येतो. कलाकारांचे डायलॉग खाली प्रमाणे आहेत...

''गोली अपने सर पर मार दो, मॅटर खतम'' - अर्जुन कपूर

''शेर भुका हो तो क्या जहर खा लेगा...'' तब्बू

''मुँह मांगा दाम दूँगा, उसे उडाने का'' - नसिरुद्दीन शाह

''बकरी हम, कुत्ता तू, और शेर तेरा मालिक'' - कोंकणा सेन शर्मा

''तेरे साथ जिना, मेरे साथ मारना भी'', राधिका मदन

''फापडा हो गया हूँ थेपला खिला खिला के, ऑईल और गॅस मंत्रालय खोल दिया इसने पेट में, इसे तो मैं उडाऊंगा'' - कुमुद मिश्रा

डायलॉगच्या पार्श्वभूमीवर आवारा डॉग है आवारा हे गाणे वाजत राहते व अखेरीस १३ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, हे टेक्स्ट वाचायला मिळतात.

'कुत्ते' हा चित्रपट त्याच्या नावापासूनच चर्चेत आहे. विशाल भारद्वाजचा मुलगा आस्मान भारद्वाजचे या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मोशन पोस्टवरुन चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढीस लागली आहे.

हेही वाचा -गणिताचा असा सराव करुन घ्यायचे वडील हरिवंशराय बच्चन, बिग बींनी सांगितला किस्सा

ABOUT THE AUTHOR

...view details