मुंबई- आंतरराष्ट्रीय एमी नामांकित लस्ट स्टोरीजच्या 2 दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी बुधवारी रोमांचक ट्रेलरचे लॉन्चिंग केले. तमन्ना भाटियाने इनस्टाग्रामवर ट्रेलर शेअर केला आहे. लस्ट स्टोरी २ २९ जून रोजी नेटफ्लिक्सवर येत असून ही मालिका पाहण्याचे आवाहन तमन्नाने केले आहे.
याआधी लस्ट स्टोरी २ च्या निर्मात्यांनी आगामी सीझनसाठी एक टीझर रिलीज केला होता. वेगवेगळ्या वयोगटातील आणि वर्गातील लोकांचा वासना या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयाबाबतचा दृष्टीकोन यामध्ये दाखवण्यात आला होता. काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, अमृता शुभाश, तिलोतमा शोम आणि कुमुद मिश्रा असे प्रतिभाशाली कलाकार या शोसाठी एकत्र आले आहेत. या कलाकारांव्यतिरिक्त, तमन्ना भाटिया आणि विजय वर्माची जोडी आणि केमिस्ट्री लक्ष वेधून घेत होती.
स्त्रीलिंगी नजरेतून नातेसंबंधांचे परीक्षण लस्ट स्टोरीज 2 मध्ये करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला म्हणाले, 'आम्ही आमच्या चाहत्यांसाठी आमच्या एमी नामांकित, लस्ट स्टोरीज 2 ची दुसरी आवृत्ती आणताना रोमांचित आहोत. आपण आमचे सर्व चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिले आहेत, ज्यात मिशन मजनू, लस्ट यांचा समावेश आहे. कथा, पावा कढ़ाईगल, रात अकेली है आणि धमाका हे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि त्यांना ते खूप आवडलेत. त्यामुळे आमच्या स्टोरीज 2 साठी योग्य व्यासपीठ बनले आहे. नेटफ्लिक्स आणि आशी दुआ सोबत या अत्यंत आवडत्या गाथेवर काम केल्याने ही संपूर्ण प्रक्रिया खूप जास्त आनंददायकझाली.'लस्ट स्टोरीज 2 चा प्रीमियर 29 जून 2023 रोजी नेटफ्लिक्सवर होईल.
लस्ट स्टोरीज-2 च्या निमित्ताने तमन्ना आणि विजय यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर भरपूर चर्चा होताना दिसत आहे. तमन्ना आणि विजय शिवाय या लस्ट स्टोरीज २ मध्ये अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे ही वेब सीरिज चार दिग्दर्शकांनी मिळून तयार केली आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा, आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा आणि सुजॉय घोष यांनी यातील चार कथांचे दिग्दर्शन केलंय. लस्ट स्टोरी वेब सीरिजचा पहिला भाग, 2018 रोजी आला होता. या अगोदरच्या वेब सीरिजची निर्मिती करण जोहर, झोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी यांनी मिळून केली होती.