मुंबई :टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनी आता चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, सर्वांनाच माहित आहे. धोनी हा त्याच्या आगामी चित्रपट 'एलजीएम ( लेट्स गेट मॅरीड)' (LGM)मुळे चर्चेत आला आहे. धोनीने हा निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. तसेच आता धोनीच्या या चित्रपटाबात सोशल माडिया फार जास्त चर्चा होत आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्या प्रोडक्शन हाऊसचा एलजीएम (लेट्स गेट मॅरीड) या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कौटुंबिक असून या चित्रपटात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. या चित्रपटात हरीश कल्याण, इवाना, नादिया महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट कमी बजटमध्ये तयार केला आहे. मात्र धोनी चाहते या चित्रपटाला फार पसंत करेल हे नक्की. आदल्या दिवशी धोनी पत्नी साक्षीसोबत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी चेन्नईला पोहोचला होता. चित्रपटाची कहाणी आजच्या प्रेमावर आधारित आहे.
काय आहे चित्रपटाची कथा? :एलजीएम ( लेट्स गेट मॅरीड) या चित्रपटाचा ट्रेलर चेन्नईच्या लीला पॅलेसमध्ये लाँच करण्यात आला. एलजीएमच्या ट्रेलरबद्दल बोलायचे तर हरीश कल्याण आणि इवाना या चित्रपटात कपल म्हणून दिसणार आहेत. या चित्रपटात हे कपल लग्न करण्याचा निर्णय घेतात, परंतु त्यानंतर इवानाला तिच्या बॉयफ्रेडच्या आईसोबत राहायचे असते, त्यामुळे ती तिच्या बॉयफ्रेडच्या पालकांसोबत बाहेर जाण्याची योजना आखते, जेणेकरून ते एकमेकांना चांगले ओळखू शकतील. पण दुर्दैवाने प्रवासादरम्यान, इवाना आणि तिच्या होणाऱ्या सासूचे अपहरण होते यानंतर या दोघींना जंगलात नेले जाते, आता ती स्वतःला कशी वाचवते आणि कुटुंबातील सदस्य त्यांना कसे शोधतात, इथून कथा सुरू होते.