महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Amitabh bachchan birthday : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या 'टॉप पाच' चित्रपटाबद्दल जाणून घ्या.... - अमिताभ बच्चन

Amitabh bachchan birthday : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आज आपला 81वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'बिग बी'नं हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. आजही ते चित्रपटसृष्टीत सर्वाधिक सक्रिय आहेत.

Amitabh bachchan birthday
अमिताभ बच्चनचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 1:33 PM IST

Updated : Oct 11, 2023, 2:37 PM IST

मुंबई - Amitabh bachchan birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे 'महानायक' अमिताभ बच्चन आज, 11 ऑक्टोबर रोजी आपला 81वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत यात शंका नाही. 70च्या दशकातील अँग्री यंग-मॅन म्हणून ओळख मिळविणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बच्चन एकामागून एक उत्कृष्ट कामगिरीनं अनेकांवर भुरळ घालत आहेत. बच्चन हे अजूनही चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. 'बॉलिवुडचा बिग बी यांना शतकातील मेगास्टार म्हणतात तर काहीजण त्यांना शहेनशाह म्हणतात. अमिताभ बच्चन जवळपास गेली 54 वर्ष चित्रपटसृष्टीत घट्ट पाय रोवून उभे आहेत.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पाच चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.

1. जंजीर : 'जंजीर' हा 1973मध्ये आला होता. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटामध्ये विजय नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्याबरोबर , जया भादुरी, प्राण, ओम प्रकाश, राम सेठी, अजित, बिंदू हे कलाकार दिसले होते. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता.

2. दीवार : दीवार हा चित्रपट 1975 मध्ये आला होता. 'बिग बी'सह या चित्रपटामध्ये शशी कपूर, निरुपा रॉय, नीतू सिंग, परवीन बाबी हे कलाकार दिसले होते. या चित्रपटामध्ये अमिताभ यांनी विजय ही व्यक्तिरेखा साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये बिग बी यांनी जबरदस्त अभिनय केला होता. या चित्रपटामध्ये विजय गुन्हेगारीकडे वळतो. तर रवी (शशी कपूर), त्याचा धाकटा भाऊ एक प्रामाणिक पोलीस अधिकारी बनतो. रवीला विजयला पकडायचे असते. त्यानंतर दोघेही भाऊ नशिबानं एकमेकांविरुद्ध उभे राहतात. हा चित्रपट अमिताभ यांच्यासाठी खूप खास आहे.

3. डॉन : अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' चित्रपट 1978मध्ये आला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत झीनत अमान, प्राण, इफ्तिखार हे कलाकार होते. या चित्रपटामध्ये डॉन (अमिताभ बच्चन) पोलिसांच्या तावडीतून पळताना ऑफिसर डिसिल्व्हा (इफ्तेखार) सोबत झालेल्या झटापटीत मारला जातो. डॉनच्या उर्वरित टोळीच्या कारवाई करण्याच्या आशेने, डिसिल्व्हा हा डॉन सारख्या दिसणाऱ्या विजयला (बच्चन) डॉन सारखे बनवून डॉनच्या टोळीत पाठवतो. त्यानंतर विजय हा सर्व गुंडांना पकडून देतो.

4 त्रिशूल :अमिताभ बच्चन हे'त्रिशूल' चित्रपटामध्ये संजीव कुमार, शशी कपूर, राखी, हेमा मालिनी, पूनम धिल्लन, सचिन या कलाकारांसोबत दिसले होते. हा यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपट आहे. सलीम-जावेद लिखित आणि गुलशन राय निर्मित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला होता. हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता.

5 सिलसिला : 'बिग बी'चा हा चित्रपट 1981 मध्ये आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. पण चाकोरीबाहेरच्या चित्रपटात या चित्रपटाची गणना होते. या चित्रपटातील गाणी देखील गाजली. 'सिलसिला' चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासोबत जया बच्चन, रेखा, संजीव कुमार, शशी कपूर हे कलाकार होते. यश चोप्रा यांनी 'यशराज फिल्म्स' या बॅनरसाठी 'सिलसिला'चे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आहे.

हेही वाचा :

  1. Happy Birthday Amitabh Bahchchan : बच्चन कुटुंबात सर्वाधिक कमाई बिग बीची, अभिषेक आणि ऐश्वर्याला टाकले मागे
  2. Mahadev App And Lion Book App Case : महादेव ॲपनंतर ईडीच्या रडारवर लायन बुक ॲप; 'या' बॉलिवूड कलाकारांची सुरू आहे चौकशी
  3. Sam Bahadur Teaser Date: विक्की कौशलचा आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'चा टीझर होणार 'या' दिवशी रिलीज...
Last Updated : Oct 11, 2023, 2:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details