मुंबई - Leo Box Office Collection Day 5 : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचा चित्रपट 'लिओ' हा 19 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. विजयच्या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटानं साऊथमधील सर्वात मोठी ओपनिंग करून अनेक विक्रम मोडले आहेत. 'जवान'प्रमाणे 'लिओ'च्या कमाईतही प्रचंड वाढ होत आहे. थलपती विजयच्या 'लिओ' चित्रपटानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'लिओ'चा समावेश झाला आहे. रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप घेतली आहे.
लिओ बॉक्स ऑफिस कलेक्शन : पहिल्या दिवशीच या चित्रपट रुपेरी पडद्यावर जादू करत 64.8 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 35.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 39.66 कोटी आणि चौथ्या दिवशी या चित्रपटानं 42.1 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 181.95 झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या पाचव्या दिवसात आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी हा चित्रपट 25 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 206.95 होईल. हा चित्रपट अवघ्या पाच दिवसात 200 कोटीचा टप्पा ओलांडणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तूफान कमाई करत आहे.
लिओची बॉक्स ऑफिस कमाई
- एक दिवस 64.8 कोटी
- दोन दिवस 35.25 कोटी
- तीन दिवस 39.66 कोटी
- चार दिवस 40 कोटी
- पाचवा दिवस 25 कोटी कमाई होऊ शकते