मुंबई - Leo Box Office Collection Day 4: विजय थलपथीचा 'लिओ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. चार दिवसांत 'लिओ'नं अनेक चित्रपटाने रेकॉर्ड मोडले आहेत. 'लिओ' नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. चार दिवसांत या चित्रपटाचे कलेक्शन 200 कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच खूप चर्चेत आहे. दिग्दर्शक लोकेश कनकराज आणि सुपरस्टार विजय यांची जोडी यावेळीही आपली जादू रुपेरी पडद्यावर दाखवत आहे.
'लिओ'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : सकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'लिओ'नं पहिल्या दिवशी 64.8 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 35.25 कोटींची कमाई केली होती, तर तिसऱ्या दिवशी 39.66 कोटीचा व्यवसाय केला होता. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 139.85 कोटी झाले होते. हा चित्रपट आता रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 40 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं देशांतर्गत एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 179.85 होईल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड झपाट्यानं कमाई करत आहे. लवकरच 'लिओ' हा 'जवान' चित्रपटाला कमाईच्याबाबत पछाडणार आहे, असं सध्या दिसत आहे.