मुंबई - Leo box office collection day 3 :थलपथी विजयचा 2023 चा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लिओ' 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. विशेषत: तमिळ आणि तेलुगू भाषिक राज्यांमध्ये या चित्रपटानं जोरदार कमाई केली आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित 'लिओ'नं दोन दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 'लिओ' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे जाणून घेऊया...
'लिओ' तिसऱ्या दिवशी किती कमाई करेल :'लिओ'नं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं देशांतर्गत 64.8 कोटी रुपयांची तुफानी ओपनिंग केली होती. आता रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 36.88 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 100.80 कोटी झाले आहेत. हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 38.73 कोटी कमाई करू शकते. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 140.41 कोटी रु. होईल.