महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ganapath & Yaariyan 2 BO day 2 : 'गणपथ' आणि 'यारियां 2' चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर थंड कमाई - दिव्या खोसला

Ganapath & Yaariyan 2 BO day 2 : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ' आणि दिव्या खोसला कुमारचा 'यारियां 2'ला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळत आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ टीकणार नाही असं सध्या दिसत आहे.

Ganapath & Yaariyan 2 BO day 2
गणपथ आणि यारियां 2 y बॉक्स ऑफिस कलेक्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 1:17 PM IST

मुंबई: Ganapath & Yaariyan 2 day 2 :अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेला चित्रपट 'गणपथ' चित्रपट हा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. दुसरीकडे, दिव्या खोसला कुमार, यश दासगुप्ता, पर्ल व्ही पुरी आणि मीझान जाफरी यांचा 'यारियां 2' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला नाही. सध्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर खूप बिकट अवस्था आहे. आता दोन्हीही चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी किती कमाई करेल हे जाणून घेऊया...

'गणपथ' कलेक्शन खराब आहे : सकनिल्‍कच्‍या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'गणपथ'नं पहिल्या दिवशी 2.50 कोटीची कमाई केली. हा चित्रपट आता रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. दुसऱ्या दिवशी 'गणपथ' चित्रपट हा 2.5 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 5 कोटी होईल. 'गणपथ'ला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे, मात्र चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक फार कमी येत आहेत. हा चित्रपट 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनवरून 'गणपथ' हा चित्रपटाचे बजेट वसूल करू शकणार नाही असं सध्या दिसत आहे. या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ, क्रिती सेनॉन हे दोघेही अ‍ॅक्शन मोडमध्ये दाखवल्या गेले आहेत.

'यारियां 2'ची अवस्थाही वाईट : एकीकडे गणपथ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे, तर दुसरीकडे 'यारियां 2'ची अवस्थाही खूप वाईट असल्याचं दिसून येतंय. सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पहिल्या दिवशी फक्त 60 लाख रुपये कमावले आहेत, जे खूपच कमी आहेत. हा चित्रपट दुसऱ्या दिवशी 52 लाखाची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 1.12 होईल. 'यारियाँ 2' चित्रपट जवळपास 50 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ शकतो, असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Kajol Durga Puja : जुहूच्या सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवात झळकली काजोल, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
  2. Leo Box Office Collection Day 3: विजय 'थलपथीच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर केलं वादळ निर्माण...
  3. Suhana Khans song Sunoh : सुहाना खानच्या 'सुनोह' गाण्यातून शाहरुख खानला मिळाला 'प्रेरणा'चा डोस

ABOUT THE AUTHOR

...view details