मुंबई - Tiger 3 Song Out : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'टायगर 3' हा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान आता 'टायगर 3' चित्रपटामधील 'लेके प्रभु का नाम' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला अनेकजण पसंत करत आहे. या लाइव्ह डान्स नंबरमध्ये, सलमान आणि कतरिना हे ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. मनिष शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'लेके प्रभु का नाम' गाण्याबद्दल : अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले 'लेके प्रभु का नाम' हे गाणं अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायले आहे. प्रीतमनं या गाण्याला संगीत दिले आहे. अरिजित आणि सलमानमधील 9 वर्षांच्या कोल्ड वॉरनंतर त्यांनी या गाण्याद्वारे एकत्र काम केले आहे. या गाण्यात सलमान खान (टायगर) आणि कतरिना कैफ (झोया) त्यांच्यात जबरदस्त केमिस्ट्रीसह त्यांचे डान्स मूव्ह्ज देखील खूप जबरदस्त दिसत आहे. या गाण्याचं संगीत खूप दमदार आहे. यशराज फिल्म्स त्यांचा हा आगामी 'टायगर 3' चित्रपट 12 नोव्हेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.