मुंबई - Rhea Chakraborty : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान तिनं तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातील अनुभव सर्वांसोबत शेअर केला. रियानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं तिच्या तुरुंगामधील दिवसांचा उल्लेख केला आहे. तिनं व्हिडिओमध्ये सांगितले की, तुरुंगात राहणे माझ्यासाठी खूप भीतीदायक होते, पण मला असे काही लोक भेटले होते, ज्यांच्याकडून मला प्रेम मिळाले.
रिया चक्रवर्तीनं तुरुंगातील अनुभवबद्दल सांगितला : हा व्हिडिओ रिया चक्रवर्तीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा रियाला विचारण्यात आले की, तिचा तुरुंगातील अनुभव कसा होता. यावर ती म्हणते की 'जेल ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला समाजातून काढून टाकले जाते आणि एक नंबर दिला जातो'. रिया पुढं म्हटलं, 'जेव्हा मी तुरुंगात गेले तेव्हा, मी अंडर-ट्रायल कैदी होते आणि माझ्यासारख्या अनेक महिला होत्या ज्यांना शिक्षाही मिळायची होती. या महिलांना पाहून आणि बोलून मला एका वेगळ्या प्रेमाची अनुभूती झाली, कारण त्या महिला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत होत्या. होय, कधी कधी त्याची भाषा मला विचित्र वाटायची, पण त्यांना पाहिल्यानंतर जीवन स्वर्ग किंवा नरक बनवणे ही फक्त तुमची निवड आहे. परिस्थिती कशीही असो, कधीकधी ही लढाई लढणे कठीण होते. जर तुमच्यात ताकद असेल तर सर्वकाही सोपे होते'.