मुंबई - Lata Mangeshkar birth anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. त्यांनी एक्स ( ट्विटरचे जुनं नाव ) च्या माध्यमातून लता दीदींचे स्मरण करताना एक विशेष संदेश लिहिला.
पीएम मोदींनी लिहिले, 'लता दीदींना यांची जयंतीनिमित्त आठवण . भारतीय संगीतातील त्यांचे योगदान अनेक दशकांचे आहे, ज्यामुळे सार्वकालिक प्रभाव निर्माण झाला. त्यांच्या भावपूर्ण गान परफॉर्मन्सने खोल भावना जागृत केल्या आणि आपल्या संस्कृतीत त्यांचे कायमचे एक विशेष स्थान असेल.'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही लता दीदींची आठवण काढत एक पोस्ट लिहिली आहे. त्यासोबतच नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकारणी,संगीत अभिनय क्षेत्रातील सेलेब्रिटींनी लता दीदीेचे स्मरण केलं आहे.
२८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्मलेल्या ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ लता दीदीचे संगीतातील योगदान अविस्मरणीय आहे. त्यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात घुमला आणि त्यांच्या जाण्यानंतरही तीच जादू निर्माण करत आहे. 'महल' चित्रपटातील 'आयेगा आनेवाला' किंवा 'वो कौन थी?' चित्रपटातील 'लग जा गले' किंवा 'मुघल-ए-आझम'मधील 'प्यार किया तो डरना क्या' या आयकॉनिक ट्रॅकमागचा आवाज कोण विसरू शकेल? या दिग्गज गायकीने संगीत उद्योगावर अनेक दशके राज्य केले.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले. त्यांना कलेचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. 2001 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. 2007 मध्ये, फ्रान्सने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर बहाल केला.