मुंबई : प्रेम हा विषय किंवा भावना याशिवाय कुठलाही भारतीय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. प्रेम ही भावनाच अशी आहे जी ताकद येते. “प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेमाला प्रेमानेच जिंकता येऊ शकतं हा विचार घेऊन हा चित्रपट केला आहे. सुजित चौरे आणि श्वेता काळे ही फ्रेश जोडी आणि चित्रपटाचं संगीत नक्की प्रेक्षकांना आवडेल,” असे दिग्दर्शक अर्जुन गुजर म्हणाले.
कलाकारांची तगडी फौज
चित्रपटाला साजेशी दणक दणक, सरलं, पायी फुफाटी, दचकतंय ही चारही गाणी चांगली जमून आली असून सध्या सर्वाधिक व्ह्युज मिळवत ही गाणी गाजतायेत. ‘सरलं सार अंधार सरलं पुनवेचा चांद उगल तुझ्याच येण्यान र’.... हे बहारदार प्रेमगीत प्रत्येकाच्या ओठावर आहे तर ‘हलगीपुढं DJ नं नाद करायचा नाय’ या गाण्याने तर प्रत्येकाला वेड लावलं असून त्याच्या ठेक्यावर संपूर्ण महाराष्ट्र नाचतोय. अजय गोगावले यांच्या आवजातील ‘पायी फुफाटा रुतला काटा’ हे गाणं ही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालं आहे. अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे आहे.
अर्जुन गुजर यांचे लेखन
‘लगन’चे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते सय्यद मुस्तफा, भारत गुजर, रत्नमाला पवळ, मोहिनी गुजर, गहिनाथ गुजर आहेत तर चित्रपटाचे सहनिर्माते बिभीषण पवार, बळे साहेब, कैलास गुजर, किशोर काकडे,नितीन भारती, सपकाळ फोजी, शाहजी डोके, सोमिनाथ डोके, मुन्ना शेख, विठ्ठल पाटोळे,बिभीषण गुजर, विष्णू गुजर, नामदेव गुजर, अंगद गुजर, गणेश गुजर आहेत. छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.
हेही वाचा -गोंगाट बंद होईल, प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर सूचक पोस्ट