महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कॉफी विथ करण 8'च्या पाचव्या एपिसोडचा प्रोमो झाला रिलीज; पाहा व्हिडिओ - वरुण धवन

KWK 7 Promo : करण जोहरचा सर्वात प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण 8'चा पाचव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' जोडी वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसत आहे.

Koffee With Karan 8 Promo
कॉफी विथ करण 8 प्रोमो

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 2:24 PM IST

मुंबई - KWK 7 Promo :चित्रपट निर्माता करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण 8' चा पाचव्या एपिसोडचा प्रोमो 20 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आला आहे. वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटामधील जोडी शोमध्ये दिसणार आहे. शोचा प्रोमो खूप धमाकेदार आहे. करण जोहर वरुण आणि सिद्धार्थसोबत या प्रोमोमध्ये मजेशीर गप्पा आणि गोष्टी करताना दिसत आहे. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये, करण जोहरनं त्याच्या 'माय नेम इज खान' चित्रपटामधील सहाय्यक दिग्दर्शक वरुण आणि सिद्धार्थबद्दल एक खुलासाही केला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण आणि सिद्धार्थ काही मुलींचे फोटो काढत होते, असं त्यानं सांगितलं.

'कॉफी विथ करण 8'चा नवीन प्रोमो रिलीज : 'माय नेम इज खान' चित्रपटाची शूटिंग लॉस एंजेलिसमध्ये सुरू होतं. या प्रोमोमध्ये वरुणनं सांगितले की, सिद्धार्थही मुलींचे फोटो घेत होता. यानंतर सिद्धार्थनं सांगितलं, 'वरुण शाहरुख खानचे फोटो तिथल्या मुलींना विकत होता'. प्रोमोमध्ये प्रथम, करणनं वरुण आणि सिद्धार्थला जगातील आदर्श पती असल्याचं सांगितले, परंतु दुसर्‍याच क्षणी त्यांच्याबद्दल असे काही खुलासे केले, की ज्यामुळं या वरुण आणि सिद्धार्थ खूप हसायला लागले. त्याचवेळी वरुण धवननं करण जोहरवर निशाणा साधला आणि शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या स्टार जोडीबाबत अनेक मजेशीर खुलासे केले होते. यावर बोलताना वरुण म्हणाला की माझ्या वडीलांच्या चित्रपटात एक कॅरेक्टर होते, 'शादीराम घर जोडे' पण करण हा तर इथे 'करण जोहर घर तोडे' आहे. हा एपिसोड गुरुवारी डिस्ने प्लस हॉट स्टार वर प्रसारित होणार आहे.

वर्कफ्रंट : वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'रणभूमि', 'मिस्टर लेले' आणि 'भेडिया 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे सिद्धार्थ हा 'योद्धा' चित्रपटामुळं चर्चेत आहे. 'योद्धा' 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. या चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. 'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक अ‍ॅक्शन मनोरंजन चित्रपट असेल. सिद्धार्थ शेवटी 'मिशन मजनू' चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्नासोबत दिसला होता. हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

  1. नील भट्टनं केली अंकिता लोखंडेच्या पतीची पोलखोल; जाणून घ्या विकी जैनचं रहस्य
  2. विकी कौशलनं शेअर केला वेदनादायी व्हिडिओ, म्हणतो - 'काल काळीज तुटलं आज शरीर'
  3. 'टायगर 3'नं विश्वचषक सामन्याच्या फायनलच्या दिवशी केली 'एवढी' कमाई; जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details