महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kushi trailer launch: 'खुशी'साठी सामंथाची कितीही प्रतीक्षा करण्यास तयार होता विजय देवराकोंडा

'खुशी' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी विजय देवराकोंडाने सामंथाचे मनापासून आभार मानले. तिच्या आजारपणामुळे शुटिंग बराच काळ लांबले होते, मात्र तो सामंथासाठी कितीही वेळ थांबायला तयार होता. तिने 'खुशी' साठी दिलेले योगदान मोठे असल्याचे सांगितले.

By

Published : Aug 9, 2023, 7:54 PM IST

Kushi trailer launch
खुशी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

हैदराबाद - विजय देवराकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या 'खुशी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. खरंतर या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण करणे सामंथासाठी खूप मोठे आवाहन होते. तिच्या वैयक्तीक आयुष्यातबऱ्याच घडामोडी होत असतानाच तिच्या आरोग्याची समस्या निर्माण झाल्या. तिची तब्येत इतकी नाजूक झाली होती की ती शुटिंगसाठी वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे खुशीचे शेड्यूल रोखण्यात आले. परंतु या सर्व परिस्थितीत विजय देवराकोंडा सामंथाच्या पाठीशी ठाम होता. ट्रेलर लॉन्चचा जोरदार सोहळा हैदराबादमध्ये पार पडला. तेव्हा सामंथाच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या विजयचे सर्वांनी कौतुक केले.

'खुशी'च्या टीमला चित्रपट पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागली कारण समांथाला शूटमधून ब्रेक घ्यावा लागला तेव्हा त्यात अडथळा आला. हा अडथळा किती काळाचा असेल याची निश्चिती नव्हती. याबद्दल विजय देवराकोंडाला विचारले असता तो म्हणाला, 'दुसरा काहीही पर्याय नव्हता आणि सामंथाला पाठिंबा देऊन आम्ही काही उपकार केले नाहीत. ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आम्हाला माहित आहे की आपल्या आरोग्याची बिकट अवस्था असताना तिने चित्रपटासाठी तिने किती योगदान दिले आहे.'

त्यावेळेस, सामंथाने इतर चित्रपटांना प्राधान्य दिल्याच्या आणि खुशी चित्रपटासाठी वेळ न देऊन विजय देवराकोंडाला अडचणीत आणल्याच्या अनेक बातम्या वेबलॉइड आणि सोशल मीडियावरुन झळकल्या होत्या. याबद्दल विजयचे वेगळे म्हणणे होते. खरंतर विजयच्या म्हणण्यानुसार खुशीची टीम अजून एक वर्षे सामंथाची वाट पाहण्यासाठी तयार होती. हा चित्रपट ज्या आव्हानांमधून गेला होता त्याबद्दल विचार करताना, विजय देवराकोंडा म्हणाला की गरज पडल्यास १० वर्षांची लीप घेण्याच्या कल्पनेवरही त्याने विचार केला होता.

विजयने सांगितले की त्यांनी चित्रपटाचा पहिला भाग बंद केला होता तेव्हा तो कॅन केला होता आणि त्याने एका दशकानंतर पात्रांच्या प्रवासासह कथा पुन्हा उघडण्याच्या कल्पनेवर लेखकांच्या टीमशी चर्चा केली. विनोदाने, विजयने असेही सांगितले की जेव्हा ते खुशीचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी सामंथाची वाट पाहत होते तेव्हा तो आणि दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी देखील इडली विकण्याचा विचार केला होता. विजयने सामंथाचे आभार मानताना सांगितले की ती ज्या परिस्थितीतून जात होती ते फार कठीण होते आणि चित्रपट पूर्ण करण्यासाठी ती खूप मेहनत घेत होती.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details