मुंबई : बॉलिवूड कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही आपल्या लव्ह लाईफच्या सुरुवातीला हे नातं लपवून ठेवलं होतं पण नंतर एकमेकांसोबतचं नातं उघडपणे स्वीकारलं. काही वेळापूर्वी अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायकाच्या डान्सचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. पण अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आल्यावर त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. या जोडप्याने याबद्दल खुलासा केला नसला तरी मलायका अरोराचा खास संदेश लिहिलेला स्वेटशर्ट याकडे निर्देश करत आहे.
मलायकाच्या स्वेटशर्टवरचा संदेश : मलायका अरोरा नुकतीच मुंबईत घरातून बाहेर पडताना पापाराझींना दिसली. पापाराझीच्या कॅमेऱ्यात तिचे काही फोटो कैद झाले आहेत. या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि पॅन्ट परिधान केला आहे. या स्वेटशर्टवर एक संदेश लिहिला आहे, जो वाचून लोक आश्चर्यचकित झाले. तिच्या स्वेटशर्टवर 'चल वेगळे होऊन जाऊ जाऊया' असे लिहिले होते. यासोबतच त्यावर स्मायलीही आहे. हा मेसेज वाचून तिचे चाहते खूप नाराज झाले आहेत. मलायकाच्या या मेसेजद्वारे त्यांच्यात ब्रेकअप झाला असेल असा अंदाज लावला जात आहे.
ब्रेकअपची अफवा :अर्जुन कपूरने याआधी त्याच्या इन्स्टा अकाउंटवर व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटा दिसत होता. दरम्यान त्याची गर्लफ्रेंड मलायकाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यासोबतच अर्जुन कपूरसोबत सगळीकडे दिसणारी मलायकाही मुंबईत ए पी ढिल्लनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकटीच दिसली. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सुरू झाल्या.
अर्जुन कपूरला नवीन गर्लफ्रेंड : दरम्यान, अर्जुन कपूर हा कुशा कपिलाला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या. मात्र, कुशा कपिलाने याबद्दल काही खुलासा केला नाही. एक पोस्ट शेअर करत कुशाने लिहिले की, 'माझ्याबद्दल इतकं बकवास रोज वाचल्यानंतर मला स्वतःची औपचारिक ओळख करून द्यावी लागेल. प्रत्येकवेळी जेव्हा मी माझ्याबद्दल काही मूर्खासारख्या पोस्ट वाचते तेव्हा मी फक्त प्रार्थना करते की माझ्या आईने हे सर्व वाचू नये.'. अशी कुशाने एक पोस्ट केली होती.
हेही वाचा :
- Actor Milind Safai passes away ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये पाडली होती छाप
- National Film Awards 2023 : 'हे' २ मराठी चित्रपट ठरले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ चे मानकरी; जाणून घ्या असं काय आहे या चित्रपटात...
- Seema Haider News: सीमा-सचिनच्या चित्रपटाचं शीर्षकच इम्पानं नाकारलं; निर्माते म्हणाले, 'मनसेमुळे...'