मुंबई- यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. करणने सोशल मीडियावर चित्रपटाच्या अपयशावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. या चिठ्ठीत त्याने चित्रपट फ्लॉप झाल्याने दुखावल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. आता या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा संजय दत्तनेही शमशेराच्या फ्लॉपवर मौन सोडले आहे. करणनंतर संजय दत्तनेही सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे.
'शमशेरा'ला फ्लॉप म्हणणाऱ्यांना संजय दत्तने एक चिठ्ठी लिहून म्हटले आहे की, 'चित्रपट ही एक उत्कटतेची कृती आहे, उत्कठता तुम्हाला यापूर्वी कधीही न भेटलेले पात्रं समोर आणते आणि शमशेरा देखील त्या कथेपैकीच एक आहे. हा चित्रपट रक्त, घाम आणि अश्रूंनी बनवला आहे, हे एक स्वप्न आहे, जे आम्ही पडद्यावर आणले आहे. चित्रपट हे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी असतात आणि चित्रपटाला त्याचे प्रेक्षक मिळतातच, मग ते उशीरा मिळतात किंवा लवकर'.