महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kriti Sanon Mother: 'आदिपुरुष' चित्रपटाला समर्थन दिल्याने क्रिती सेनॉनची आई झाली ट्रोल - गीता सेनॉन

साऊथ स्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट आदिपुरुषवर चौफेर टीका होत आहे. या चित्रपटाला सर्वत्र नाकारले जात आहे. दरम्यान,अभिनेत्री क्रिती सेनॉनची आई गीता सेनॉन या चित्रपटाच्या समर्थनार्थ समोर आली आहे.

Kriti Sanon Mother
क्रिती सेनॉनची आई

By

Published : Jun 22, 2023, 2:23 PM IST

मुंबई :साऊथ स्टार प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाबाबत देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या चित्रपटावर चौफेर टीका होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुनताशीर यांना खूप शिव्या दिल्या जात आहेत. मनोजने चित्रपटासाठी लिहिलेल्या कुरूप संवादांमुळे त्याला वारंवार शिव्या दिल्या जात आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटावर भारतात बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान आदिपुरुषच्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाद्वारे नेपाळ देशाला देखील नाराज केले आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या, निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटावरील बंदी उठवण्यासाठी नेपाळशी हातमिळवणी केली आहे. विशेष म्हणजे माता सीतेला हिंदुस्थानची कन्या संबोधल्याने संतप्त नेपाळने बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली आहे. आता या तीव्र विरोधाच्या वेळी चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी क्रिती सेनॉनची आई गीता सेनॉन या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी क्रिती सेनॉन आपल्या संपूर्ण कुटुंबासह गेली होती.

'चूका करू नका..भावना समजून घ्या' : या संदर्भात क्रिती सेनॉनची आई गीता सेनॉन यांनी तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करून लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिती सेनॉनची आई गीता सॅनन यांनी तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जाकी राही भावना जैसी, प्रभु मूर्ति देखी तीन तैसी, याचा अर्थ असा की जर तुम्ही चांगल्या विचाराने आणि चांगल्या दृष्टीने पाहाल तर हे विश्व सुंदर दिसेल, हे प्रभू रामाने शिकवलं आहे. शबरीच्या बोरामध्ये त्याचे प्रेम बघा ना, ते पण उष्टे होते. भावना समजून घ्या, माणसाच्या चुका नाही, जय श्री राम'.

क्रितीची आई ट्रोल झाली :दरम्यान, सोशल मीडियावर या पोस्टसह, क्रिती सेनॉनची आईला युजर्स ट्रोल करत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'तुम्ही या हिंदूविरोधी चित्रपटाचे आंधळेपणाने समर्थन करू नका, तुम्ही तुमच्या मुलीला हिंदू धर्म आणि तिची संस्कृती शिकवा'. दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, तुम्ही या चित्रपटाचे समर्थन करत आहात कारण यात तुमची मुलगी यात सीता बनली आहे आणि तुमच्या मुलीचा 600 कोटींचा चित्रपट फ्लॉप होऊ नये असे तुम्हाला वाटते.तर आणखी एकाने लिहिले की, 'आदिपुरुष सारख्या चित्रपटाचा भाग बनणे हे क्रिती सेनॉनचे दुर्दैव आहे.

हेही वाचा :

  1. release date of Subhedar : 'सुभेदार’च्या प्रदर्शन तारखेची घोषणा झाली, टीझरचेही झाले अनावरण
  2. Haddi Movie : नवाजुद्दीनच्या 'हड्डी' चित्रपटात 300 ट्रान्सजेंडर दिसणार
  3. Karan Deol wedding Pictures: करण देओलने इंस्टाग्रामवर शेअर केली मोहक फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details