महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kriti Sanon News : क्रिती सॅननने डिस्कोला मारली मिठी, चाहते म्हणाले.. - मोहक फोटो

अभिनेत्री क्रिती सॅननने शनिवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर डिस्को नावाच्या तिच्या पाळीव प्राण्यासोबत एक मोहक फोटो शेअर केला आहे.

Kriti Sanon
क्रिती सॅनन

By

Published : Jun 3, 2023, 5:45 PM IST

मुंबई :बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनन अनेकदा तिच्या चाहत्यासोबत तिच्या पाळीव प्राण्यासोबत फोटो शेअर करत असते. शनिवारी, तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चाहत्यासोबत पाळीव प्राण्याचे फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती तिच्या फरबॉल डिस्कोसोबत मिठी मारताना दिसत आहे. फोटो शेअर करताना क्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सर्वांना फक्त प्रेमाची गरज आहे!' तिने हा फोटो टाकताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या फोटोवर भरभरून कमेंट केले आहे. या पोस्टवर मोहक अशा कमेंट आल्या आहे. पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहले, 'मी आज पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट!!! (रेड हार्ट इमोजीसह). तर ' दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, 'हा किती सुंदर आहे.' शिवाय आणखी एकाने कमेंट केली, 'हे फोटो शांतता पसरवते'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे.

आदिपुरुष : दरम्यान, क्रितीच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर, ती 'आदिपुरुष' या पौराणिक चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ओम राऊत दिग्दर्शित, आदिपुरुष महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आहे. तर सैफ अली खान या चित्रपटात लंकेशची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच ती तिच्या 'क्रूम' या चित्रपटात देखील झळकणार आहे. 'क्रूम' या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू, दिलजीत दोसांझ आणि करीना कपूर खान देखील असणार आहे.

पुन्हा एकादा एकत्र येणार टायगर आणि क्रिती :तसेच क्रिती ही गणपती या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ देखील असणार आहे. या चित्रपटाचा नुकताच टिझर रिलीज झाला आहे. क्रितीच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सध्याला क्रिती ही पूर्ण लक्ष चित्रपट 'आदिपुरुष'साठी देत आहे. कारण तिला या चित्रपटापासून फार जास्त अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Vicky Kaushal dedicates song : विक्की कौशलने पत्नी कॅटरिना कैफला इंस्टाग्राम स्टोरीवर एक गाणे केले समर्पित
  2. Box office collection : विक्की आणि साराची प्रेक्षकांना पसंत पडणार का? पहा 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिस कलेक्शन
  3. Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण, श्वेता बच्चनने दिल्या खास शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details