मुंबई : महिला प्रीमियर लीग ४ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये होणार आहे. ही स्पर्धा ४ मार्चपासून सुरू होत आहे, तर २६ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड स्टार्स धमाल करताना दिसतील. 4 मार्च रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि कियारा अडवाणी आपल्या परफॉर्मन्सचा धडाका लावताना दिसतील. महिला प्रीमियर लीग (WPL 2023) च्या पहिल्या सत्राचा उद्घाटन सोहळा 4 मार्च रोजी फिल्मी टचने होईल. पहिल्या सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सशी भिडणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सामन्यापूर्वी रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यकमात बॉलिवूडच्या अनेक स्टार अभिनेत्री दिसणार आहेत.
पॉप सिंगर एपी ढिल्लन करणार परफॉर्म :महिला प्रीमियर लीगने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे की अभिनेत्री क्रिती सॅनन आणि कियारा अडवाणी या उत्सवाचा भाग असतील. या दोघांशिवाय प्रसिद्ध पॉप सिंगर एपी ढिल्लन देखिल परफॉर्म करणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या स्टेडियमवर सुरू होईल. ही स्पर्धा ४ मार्चपासून सुरू होत आहे तर २६ मार्चपर्यंत खेळली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण पाच संघ असून ते 22 सामने खेळणार आहेत. दोन्ही स्टेडियममध्ये प्रत्येकी 11-11 सामने खेळवले जातील. साखळी फेरीत 23 दिवसांत 20 सामने खेळवले जाणार असून एलिमिनेटर आणि अंतिम सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर साखळी फेरीदरम्यान चार डबल हेडर सामने देखिल खेळवले जातील