मुंबई -निर्माता दिग्दर्शक करण जोहरने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर त्याचा प्रसिद्ध शो 'कॉफी विथ करण' परत येणार नसल्याचे जाहीर केले. त्याने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे ज्यात लिहिलंय की, "हॅलो, कॉफी विथ करण हा माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा 6 सीझनचा एक भाग आहे. मला वाटतंय की आम्ही प्रभाव पाडू शकलो आणि पॉप कल्चरच्या इतिहासात स्थान मिळवू शकलो. आणि म्हणून मी जड अंतःकरणाने जाहीर करतो की कॉफी विथ करण परत येणार नाही..."
'कॉफी विथ करण' शोला करण जोहरने ठोकला कायमचा राम राम!! - कर जोहरची गोषणा
करण जोहरने त्याच्या प्रसिद्ध टीव्ही शो 'कॉफी विथ करण' संदर्भात सोशल मीडियालर केलेल्या घोषणेने चाहते निराश झाले आहेत. हा शो पुन्हा दिसणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे.
करण जोहर
कॉफी विथ करण हा एक प्रसिद्ध सेलिब्रिटी टॉक शो आहे, जो स्टार नेटवर्कवर प्रसारित केला जात असे. करण जोहर या शोमध्ये बॉलिवूड सेलेब्रिटींना दिलखुलास गप्पांसाठी बोलतं करीत असे. या शोचे सहा सिझन पार पडले आहेत. काहीवेळा या शोमधून काही वादग्रस्त गोष्टीही घडल्या होत्या. पण चाहत्यांनी आता दुसऱ्या सीझनची अपेक्षा करू नये.
Last Updated : May 5, 2022, 10:17 AM IST