महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Koffee With Karan 8: सनी देओल आणि बॉबी देओलनं 'कॉफी विथ करण 8'मध्ये केला खुलासा ; दुसरा एपिसोड प्रसारित - सनी देओलनं बहिणींसोबच्या नात्यावर केला खुलासा

Koffee With Karan 8 : सनी देओल आणि बॉबी देओलनं 'कॉफी विथ करण 8'मध्ये हजेरी लावली. यावेळी गदर 2 च्या यशानंतर तारा सिंगनं ईशा आणि आहाना देओलबद्दलच्या नात्यावर चर्चा केली.

Koffee With Karan 8
कॉफी विथ करण 8

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 5:36 PM IST

मुंबई - Koffee With Karan 8: सनी देओल आणि बॉबी देओल 'कॉफी विथ करण 8'मध्ये आले होते. सध्या शोचा दुसरा एपिसोड रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सनी आणि बॉबी त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसत आहेत. सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. 'गदर 2'च्या हिटमुळं देओल कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान 'कॉफी विथ करण'मध्ये सनी देओलनं बहिण ईशा आणि आहानासोबतच्या नात्याबद्दल देखील चर्चा केली. ऑगस्ट महिन्यात सनी देओलचा 'गदर 2' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

'कॉफी विथ करण 8' मध्ये देओल ब्रदर्स : या चित्रपटाद्वारे सनी, बॉबी, ईशा आणि आहाना पुन्हा एकत्र आले होते. यावेळी देओल ब्रदर्स त्याच्या बहिणीसोबत पहिल्यांदाच दिसले होते. ईशानं तिच्या जवळच्या मित्रांसाठी 'गदर 2'चे स्पेशल स्क्रीनिंगही आयोजित केले होते, ज्यामध्ये सनी देओल आणि बॉबी देओल देखील पोहोचले होते. यावेळी सनी, बॉबी आणि ईशा फोटो देखील काढले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

सनी देओलनं ईशासोबतच्या नात्यावर केले भाष्य : ईशा आणि आहाना देओलबद्दल सनी देओल म्हटलं, त्या माझ्या बहिणी आहेत. ते जे आहे ते आहे, ते कोणीही बदलू शकत नाही. या चित्रपटासाठी त्यांना खूप आनंद झाला. या सगळ्यामध्ये घडलेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हा चित्रपट यशस्वी ठरला.

'गदर २' च्या यशावर बॉबी सांगितलं : देओल कुटुंबानं 'गदर 2'चं यश कसे साजरे केले. याबद्दल बोलताना बॉबी सांगितल, 'हे सर्व करणच्या लग्नापासून सुरू झाले. आम्ही आमच्या कुटुंबासह असे कधीच पुढे आलो नाही. आम्ही खूप लाजाळू आहोत, मात्र लग्नातील कोणत्याही पाहुण्याला व्हिडिओ बनवण्यापासून रोखू शकलो नाही. त्या व्हिडिओंमुळं आम्हाला लोकांचे खूप प्रेम मिळाले, कारण आम्ही कसे आहोत हे लोकांनी पाहिले. मला वाटते की द्रीशा, आमची मुलगी लक घेऊन आली आहे. करणच्या लग्नात भाऊ नाचत होता आणि मग 'गदर 2' आला मी माझ्या भावाला एवढा नाचताना कधीच पाहिला नव्हत'. करण देओलचं लग्न मोठ्या थाटात झाले होतं. या लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

हेही वाचा :

  1. Dunki teaser hype : 'डंकी'च्या टीझरमुळे इंटरनेटवर वादळ, शाहरुखच्या चाहत्यांसाठी गगन ठेंगणे !
  2. Nick and Priyanka : निक जोनासनं प्रियांका चोप्राचा फोटो शेअर करत 'जस्ट लुकिंग लाइक अ व्वा' ट्रेंड केला फॉलो
  3. Varun and lavanya marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details