मुंबई - koffeeWith Karan 8 New Promo: करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण'चा प्रत्येक सीझन खूप खास असतो. 'कॉफी विथ करण'चा सीझन 8 खूप सध्या चर्चेत आहे. या शोच्या नव्या एपिसोडचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. नव्या एपिसोडमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सॅम बहादूर स्टार विकी कौशल येणार आहेत. करण जोहर या एपिसोडमध्ये अनेक गुपिते उघडणार आहेत. 'कॉफी विथ करण 8' या शोचा नवा प्रोमो रिलीज झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत कियारा आणि विकीचे कौतुक केले आहेत.
'कॉफी विथ करण 8' प्रोमो झाला रिलीज : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या शोच्या नवीन प्रोमोमधील कियारा अडवाणी आणि विकी कौशलचा लूक खूप सुंदर आहे. चाहते त्याच्या लूकमुळं प्रभावित झाले आहे. कियारानं या शोमध्ये डीप ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन परिधान केला आहे. याशिवाय तिनं लाईट मेकअप केला असून यावर केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. दुसरीकडे विकी कौशलनं ब्लॅक सुट घातला आहे. या एपिसोडमध्ये दोघांनी धम्माल उडवून दिली आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमध्ये करण जोहर त्याचे पाहुणे कियारा आणि विकीला मजेशीर प्रश्न विचारताना दिसतो. यावर या दोघांनी चांगली उत्तरंही दिली आहे.