मुंबई - Koffee With Karan 8:'कॉफी विथ करण 8' च्या नवीन एपिसोडमध्ये, आदित्य रॉय कपूरनं 'आशिकी 3'मध्ये कार्तिक आर्यनच्या अभिनयावर आणि फ्रेंचायझीवर प्रतिक्रिया दिली. गेल्या वर्षी, अनुराग बसू दिग्दर्शित आणि भूषण कुमार आणि मुकेश भट्ट निर्मित 'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यन भूमिका साकारण्यासाठी सज्ज असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान 'आशिकी 2' मध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळालं. आता 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या आगामी एपिसोडमध्ये, आदित्य रॉय कपूरनं कार्तिक आर्यनला आशिकी फ्रँचायझीमध्ये घेतल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
'आशिकी 3'च्या कास्टिंगवर आदित्य रॉय कपूर दिली प्रतिक्रिया :'कॉफी विथ करण सीझन 8' वर करण जोहरनं आदित्य रॉय कपूरला कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3' मध्ये कास्ट करण्याबद्दल विचारले. यावर त्यानं म्हटलं, ''मला वाटते की 'आशिकी 3'मध्ये अभिनय करण्यासाठी कार्तिक हा परिपक्व व्यक्ती आहे''. पुढं त्यानं म्हटलं, ''या चित्रपटामध्ये मी असण्याची शक्यता कमी होती, कारण दुसऱ्या भागात माझी व्यक्तिरेखा खूप लांब पोहोचली होती जिथून मी परत येऊ शकणार नाही''. आदित्यसोबत या कॉफी सोफ्यावर अर्जुन कपूरनं देखील हजेरी लावली आहे. आदित्यनं 'द नाईट मॅनेजर' या हिट वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. या हिट वेब सीरीजवर बोलताना अर्जुन कपूरनं म्हटल, ''आता आदित्य नाईट मॅनेजर झाला आहे''.