मुंबई - पाकिस्तानची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री माहिरा खानने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली आहे. सौंदर्य आणि दमदार अभिनयाचा संगम म्हटलं तर माहिरा या टॅगसाठी परफेक्ट आहे. ही अभिनेत्री प्रामुख्याने 'हमसफर' या टीव्ही शोमुळे प्रसिद्ध झाली. 'रईस' या भारतीय चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान होता.
कराचीमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीने 2006 मध्ये व्हीजे म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. शोएब मन्सूर (2011) दिग्दर्शित 'बोल' चित्रपटातून गायक आतिफ अस्लमसोबत स्क्रीन डेब्यू झाला. चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. एवढेच नाही तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (चित्रपट) लक्स स्टाईल पुरस्कारही माहिराच्या नावावर होता. माहिराचे फिल्मी करिअर खूप यशस्वी ठरले आहे.