मुंबई - सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या बाबतीत समीक्षकांच्या नकारात्मक ते संमिश्र प्रतिक्रिया असूनही, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. शुक्रवारी 15 कोटींच्या कमकुवत पदार्पणानंतर, चित्रपटाने शनिवारी ईदच्या सुट्टीत 25 कोटी रुपयांची कमाई केली आणि रविवारीही अशीच कमाई संख्या नोंदवली गेली. त्याचे सध्या देशांतर्गत सुमारे 66.5 कोटी रुपयांचे एकूण संकलन झाले आहे.
स्टार स्टडेड चित्रपट- हाऊसफुल 4 फेम फरहाद सामजी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात स्टार-स्टडेड कलाकारांचा समावेश आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, नायिकेच्या रूपात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, बिग बॉस 13 फेम शहनाज गिल, नवोदित पलक तिवारी, जगपती बाबू, भूमिका चावला, जस्सी गिल, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, विजेंदर सिंग आणि विनाली भटनागर या कालाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स (SKF) च्या बॅनरखाली झाली आहे.
बॉक्स ऑफिस कमाई - चित्रपटाच्या व्यवसायाबद्दल बोलताना, एका अहवालात असे म्हटले आहे की सलमान खान स्टारर किसी का भाई किसी की जान चित्रपटाने संडे बॉक्स ऑफिसवर अंदाजे 24.50 ते 25 कोटी रुपयांची कमाई होती. अहवालानुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये रविवारी संकलनात सुधारणा झाली. चित्रपटाने परदेशात चांगली कामगिरी केली आहे, आखाती देशातील कलेक्शनमुळे या चित्रपटाची कमाई $4.5 दशलक्ष पर्यंत पोहोचली आहे.
पलक तिवारी आणि शहनाझ गिलचे पदार्पण - पलक तिवारी आणि शहनाझ गिल यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान खानने त्यांना संधी दिल्यामुळे दोघेही खूप कृतज्ञ आहेत. अशा प्रकारे मोठी संधी देऊन बॉलिवूडचा मार्ग सुकर केल्याबद्दल तिने सलमान खानचे आभार मानले आहेत. चित्रपट रिलीज झाला तेव्हा खरंतर खूप मोठ्या अपेक्षा चाहत्यांना होत्या. मात्र या चित्पटाचे रिव्ह्यू मनासारखे आले नाहीत. जे लोक सलमानचे हार्डकोअर समर्थक आहेत त्यांनी सिनेमाला गर्दी केली. जो सामान्य प्रेक्षक आहे तो अद्यापही सिनेमापासून दूरच राहिला आहे.
हेही वाचा -Amitabh Bachchan Tweet On Blue Tick : ए ट्विटर खेल खतम, पैसे हजम.. बिग बींनी पुन्हा घेतली ट्विटरची फिरकी