मुंबई- KK Singer Video Viral : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ (केके) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे एका मैफिलीत आजारी पडल्याने निधन झाले. ते केके या नावाने प्रसिद्ध होते. वयाच्या ५३ व्या वर्षीही ते रसिकांमध्ये पूर्ण उत्साहाने गाणे म्हणत होते. अचानक गायकाला अस्वस्थ वाटू लागले आणि ते स्टेजवरून खाली उतरले. पाहूया केकेच्या मृत्यूपूर्वीचा तो व्हिडिओ..
व्हायरल व्हिडिओमध्ये गायक केके कॉन्सर्टमधून अस्वस्थपणे धावताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केकेच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच सिंगरचा मृत्यू झाला.
दरम्यान, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.. ज्यामध्ये गायक चाहत्यांच्यामध्ये सहज गाताना दिसत असून अचानक स्टेज सोडून परत येतो आणि माइक काढताना दिसत आहे.