मुंबई- सलमान खानच्या आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जानचा टीझर 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या पठाण या अॅक्शन चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये दाखवण्यात आला. टीझरची सुरुवात सलमान बाईक चालवताना होते आणि नंतर मेट्रोमध्ये तो बदमाशांना बेदम चोपतो. यात तो अभिनेत्री पूजा हेगडेवर रोमान्स करताना दिसत आहे. जवळजवळ एक मिनिट-40-सेकंदाच्या टीझरमध्ये मारामारीची दृश्ये देखील दर्शविली गेली आहेत, जिथे सलमान रफ आणि टफ दिसत असून, इमारतीवरून उडी मारताना आणि जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.
किसी का भाई किसी की जानच्या टीझरने सलमानच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. किसी का भाई किसी की जानच्या टीझरवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या चित्रपटात सलमान एका नवीन अवतारात दिसणार आहे, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. टीझरवर प्रतिक्रिया देताना अफानने लिहिले, 'प्रामाणिक कबुलीजबाब: मला अपेक्षित नव्हते.. पण हा मास टीझर आहे जबरदस्तच. सर्वत्र ब्लॉकबस्टर लिहिलेले आहे. भाईजानचा आवाज.. गूजबंप्स. आणि आमची #शेहनाझ गिल मोठ्या स्क्रीनवर सलमानसोबत. तेही दक्षिण भारतीय लूकमध्ये, भारीच. ' आणखी एका चाहत्याने लिहिले, शेवटी टायगर आणि पठाण एकत्र येऊन जाळ करताना दिसले. याला म्हणतात बवाल. दुसर्या चाहत्याने लिहिले, किसी का भाई किसी की जान पाहिल्यानंतर मला आता आणखी खात्री वाटते की हा एक मोठा ब्लॉकबस्टर ठरणार आहे!! सलमान खान बॉक्स ऑफिसवर बवाल करणार हे नक्की.