मुंबई- अभिनेता सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील 'जी रहे थे हम' हे लव्ह गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. सलमानने त्याच्या अधिकृत इंन्स्टाग्राम हँडलवर हे रोमँटिक गाणे जारी करून त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सना आश्चर्यचकित केले आहे. त्याची ऑन-स्क्रीन लव्ह इंटरेस्ट पूजा हेगडे, तसेच राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगमसह, सलमान खान व्हिडिओमध्ये आनंदी मूडमध्ये दिसत आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीच्या सीनमध्ये सलमान लांब केस यासह खूपच सुंदर दिसत आहे. त्याची पूजा हेगडेसोबतची केमेस्ट्री अफलातून वाटतेय. यात सलमान आणि पूजा एका अंधुक प्रकाशाच्या खोलीत रोमँटिक डेट करताना दिसतात, त्यांच्याभोवती झुंबरे आहेत. ते अगदी फ्री फॉल मूव्हमध्ये खूपच भारी वाटतात. विशेष म्हणजे सलमानने हे गाणे गायले आहे, अमाल मलिकने संगीत दिले आहे, तर शब्बीर अहमदने गीते लिहिली आहेत. गाणे शेअर करताना सलमानने लिहिले: 'वो जो फॉलिंग वाला स्टेप है जिसमे कोई स्टेप नहीं है, वो करके दिखा दो... लव का तो पता नहीं गिरना निश्चित आहे.' या गाण्याने सलमानच्या चाहत्यांना आठवणींना उजाळा मिळाला असेल आणि सलमानचे हँगओव्हर गाणेही आठवले असेल. किसी का भाई किसी की जानचे हे गाणे ताल धरायला लावणारे आहे.