महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

किशोर कुमार मराठी गाणी : मराठी गाणे गाताना किशोरदांनी अडचणीवर अशी केली मात - Kishore Kumar Jayanti Special

'अश्विनी ये ना'..हे 'गंमत जम्मत' सिनेमातील किशोर कुमार यांनी गायलेले सुपरहिट गाणे आपण कधीच विसरू शकत नाही. मात्र, हे गाणं गायला आधी किशोर कुमार यांनी ठामपणे नकार दिला होता. हा नकार होकारामध्ये नक्की कसा बदलला याचा मोठा खुमासदार किस्सा या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी सांगितला होता.

किशोर कुमार मराठी गाणी
किशोर कुमार मराठी गाणी

By

Published : Aug 4, 2022, 12:28 PM IST

मुंबई - बहुप्रतिभा लाभलेली माणसे अतिशय मोजकी असतात, त्यापैकीच एक नाव म्हणजे किशोर कुमार. अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, निर्मिती, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली एक खास ओळख निर्माण केली होती. आज त्यांचा जन्मदिन. त्यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्य किशोरदांची आठवण करताना ओठावर सहज येतात ती त्यांची मराठीत गायलेली गाणी.

किशोरदांनी भारतातील अनेक भाषेमध्ये गाणी गायली आहेत. यामध्ये हिंदी सोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषेतील गाण्यांचा समावेश होतो. त्यांनी मराठीत केवळ तीन गाणीच गायली आहेत.

'अश्विनी ये ना'..हे 'गंमत जम्मत' सिनेमातील किशोर कुमार यांनी गायलेले सुपरहिट गाणे आपण कधीच विसरू शकत नाही. मात्र, हे गाणं गायला आधी किशोर कुमार यांनी ठामपणे नकार दिला होता. हा नकार होकारामध्ये नक्की कसा बदलला याचा मोठा खुमासदार किस्सा या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी सांगितला होता. या मराठी गाण्याचं प्रपोजल घेऊन सचिन हे किशोरदांना भेटले. पण त्यांनी हे गाणं गायला नकार दिला. सचिनजींना यामागचं कारण विचारलं असता, तुमच्या प्रत्येक मराठी गाण्यात 'स' आणि 'च' च्या मध्ये एक शब्द असतो अस हे किशोरदा बोलले. सचिन म्हणाले, अहो असा मराठीत एकही शब्द नाही. त्यावर किशोरदांनी तुम्ही 'चमचा' कस म्हणता असे विचारून तो 'च' आपल्याला उच्चरता येत नाही असे त्यांनी सांगितलं, तसेच तुमच्या मराठीत 'ड' आणि 'द' असा काहीतरी शब्द असतो, त्यावर सचिनजी म्हणाले, अहो असा कोणताच शब्द नसतो! त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की की ते 'ळ' बद्दल बोलत आहेत.

त्यानंतर सचिनजींनी त्यांना तुम्ही गाण्याचा जो भाग गाणार त्यात 'च' आणि 'ळ' हे शब्द नसतील तर..?? असे विचारले. त्यावर आपण हे गाणं नक्की गाऊ असे किशोर कुमार यांनी सांगितले. नंतर ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याकडून तसं गाणं लिहून घेण्यात आलं. त्यानंतर मेहबूब स्टुडिओत ते रेकॉर्डिंग करण्यात आले, असा किस्सा सचिनजींनी यावेळी सांगितला.

'अश्विनी ये ना'.. गाणे- ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील हे गाणे अभिनेते अशोक सराफ आणि चारुशिला साबळे यांच्यावर चित्रीत झाले आहे. अरुण पौडवाल यांनी हे गाणे कंपोज केले होते. त्यावेळी हे गाणे अक्षरश: लोकांनी डोक्यावर उचलून धरले होते. आजही हे तितकेच लोकप्रिय आहे.

किशोरदा यांनी गायलेली इतर दोन गाणी ‘तुझी माझी जोडी जमली’ आणि ‘घोळात घोळ’ या चित्रपटातील आहेत.

गोरा गोरा मुखडा गाणे - किशोर कुमार यांनी ‘घोळात घोळ’ या चित्रपटातील गोरा गोरा मुखडा हे देखील गाणे गायले आहे. या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांनी भूमिका साकरली होती. या गाण्याचे बोल किशोर नांदोडे यांनी लिहिले होते तर अनिल मोहिले यांनी याला संगीतबद्ध केले होते.

‘तुझी माझी जोडी जमली’ गाणे- ‘तुझी माझी जोडी जमली’ या चित्रपटातील गाणे देखील किशोर कुमार यांनी गायले होते. किशोरदांनी गायलेले हे त्यांचे तिसरे व अखेरचे गाणे होते. अरुण पौडवाल यांनी हे गाणे कंपोज केले होते. अभिनेता अशोक सराफ हे गाणे चित्रीत करण्यात आले होते.

हेही वाचा -Mithilesh Chaturvedi: गदर, कोई मिल गया फेम अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details