मुंबई - चित्रपट निर्माती किरण रावने दिग्दर्शित केलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट पुढील वर्षी ३ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी बुधवारी केली. 2011 च्या धोबीघाट चित्रपटानंतर किरण रावने दिग्दर्शित केलेला हा दुसरा विनोदी चित्रपट आहे.
लापता लेडीज हा ग्रामीण बाज असलेला विनोदी चित्रपट आहे. यामध्ये दोन नववधू ट्रेनमधून गायब झाल्यानंतर उडालेला गोंधळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानसोबत किरण रावने केली आहे. किरण दहा वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळली आहे.