महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kiara And Sidharth : कियारा वाढदिवस सेलिब्रेशनसाठी पती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत अज्ञात स्थळी रवाना - birthday holiday

कियारा अडवाणी ३१ जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत अज्ञात स्थळी रवाना झाली आहे.

Kiara And Sidharth
कियारा आणि सिद्धार्थ

By

Published : Jul 28, 2023, 2:49 PM IST

मुंबई :बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ३१ जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे आणि ती पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत परदेशात जात आहे. हे कपल गुरूवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दिसले होते. सिद्धार्थ आणि कियारा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशात जात असल्याचे यावेळी दिसले. पापाराझीने जेव्हा या जोडप्याला मुंबई विमातळावर स्पॉट केले तेव्हा हे जोडपे विमातळात प्रवेश करत होते. कियारा हसत हसत सिद्धार्थच्या हातात हात घालून डिपार्चर गेटकडे जात होती. दरम्यान यावेळी कियाराने पांढऱ्या टॉपसह बेज रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता, तर सिद्धार्थने टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट परिधान केला होता. लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्याने यावर एक जॅकेट घातले होते. यावेळी हे कपल कॅज्युअल लुकमध्ये दिसले.

कियारा सिद्धार्थ परदेशात रवाना : कियाराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर सिद्धार्थसोबतचा एक सुंदर सेल्फी त्यांच्या फ्लाइटच्या आधी शेअर केला. या फोटोच्या पोस्टवर तिने लिहले, 'टाईम टू' (विमान इमोजी) तसेच पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी या कपलची प्रशंसा केली आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे एकमेकांसाठी बनलेले आहेत असे अनेकांनी कमेंट विभागात म्हटले आहे. याशिवाय अनेकांनी कियाराच्या लूकबद्दल देखील तिचे कौतुक केले आहे.

सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तसेच लग्नापूर्वी या जोडप्याने शेहशाह या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या दरम्यानच दोघे एकमेकांना डेट करायला लागले होते. त्यानंतर अनेकदा दोघे पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत होते. दरम्यान आता दोघे एकमेकांबद्दलचे त्यांचे प्रेम उघडपणे प्रदर्शित करतात. मुलाखती आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान, ते एकमेकांबद्दल त्यांच्या प्रेमाबद्दल बोलत असतात.

कियाराने केले सिद्धार्थचे कौतुक : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियाराने सिद्धार्थचे खूप कौतुक केले. तसेच सिद्धार्थ मल्होत्राने देखील एका कार्यक्रमादरम्यान पत्नी कियाराची प्रशंसा केली होती.

हेही वाचा :

  1. Hrithik Roshan and Saba Azad : सबा आझादने हृतिक रोशनसोबत घालवला चांगला वेळ ; सोशल मीडियावर फोटो शेअर
  2. Ankush release date : केतकी माटेगावकर आणि मंगेश देसाई नव्या धमाक्यासाठी सज्ज, 'अंकुश' रिलीज तारखेची घोषणा
  3. RARKPK Movie : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट रूपेरी पडद्यावर आज होणार प्रदर्शित....

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details