मुंबई - Kiara Advani Wishes Birthday Sidharth Malhotra :अभिनेत्री कियारा अडवाणीचा पती सिद्धार्थ मल्होत्रा आज 16 जानेवारी रोजी 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान कियारा अडवाणीनं आणि सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे सुंदर-रोमँटिक फोटो शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कियारानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरी सेक्शनवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंस 'हॅपी बर्थडे माय लव्ह'. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
कियारा अडवाणीनं केला सिद्धार्थ मल्होत्राचा वाढदिवस साजरा : याशिवाय सिद्धार्थनं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ करण जोहरसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. याशिवाय या विशेष प्रसंगी कियारानं सिद्धार्थसाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त फिल्म थीम असलेला केकही केकही निवडला, ज्यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे. दरम्यान चाहत्यांना चित्रपटाची थीम असलेला वाढदिवसाचा केक खूप आवडला आहे. सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या केकवर काळा सुट घालेला पुतळा हा उभा आहे. हा केक खूप आकर्षक आहे. दरम्यान काही इतर फोटोमध्ये हे जोडपे फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. सिद्धार्थनं आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.