महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kiara Advani : इंडिया कॉउचर वीकमध्ये कियारा अडवाणीने सासूला दिले फ्लाइंग किस... - सासूला फ्लाइंग किस दिली

कियारा अडवाणीने इंडिया कॉउचर वीक (ICW) शोसाठी शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. यावेळी तिने गुलाबी रंगाचा थाई हाय स्लिट लेहेंगा घातला होता. या शोसाठी रॅम्प वॉक करताना तिने सासूला फ्लाइंग किस दिले.

Kiara Advani
कियारा अडवाणी

By

Published : Jul 26, 2023, 11:20 AM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. कियारा या वर्षी सिद्धार्थ मल्होत्रासोबत विवाहबंधनात अडकली आहे. ती तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य खूप चांगल्या प्रकारे सध्या सांभाळत आहे. कियारा नेहमीच तिच्या सासू सासऱ्यांसोबत चांगला वेळ घालवत असते. कियाराला अनेकदा तिच्या सासूसोबत पाहिले गेले आहे. सध्या कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रॅम्प वॉक करताना तिच्या सासूला फ्लाइंग किस देताना दिसत आहे. कियारा आणि तिच्या सासूचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

इंडिया कॉउचर वीक :कियारा अडवाणीने मंगळवारी इंडिया कॉउचर वीकमध्ये डिझायनर्स फाल्गुनी आणि शेन पीकॉकसाठी रॅम्प वॉक केला. कियाराने गुलाबी रंगाचा थाई हाय स्लिट लेहेंगा घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कियाराचा रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लाईक केल्या जात आहे. कियारा या व्हिडिओत रॅम्प वॉक करताना बाजूला बसलेल्या सासूला फ्लाइंग किस करते. त्यानंतर तिची सासूही तिला किस फ्लाइंग देते. सासू आणि सुनेचे हे बॉन्डिंग चाहत्यांना खूप आवडले आहे.

चाहत्यांनी कमेंट केली :सध्या कियाराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती शोनंतर सिद्धार्थच्या आईला भेटते आणि दोघीही एकामेंकीना मिठी मारतात. यूजर्स या व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहेत. एका यूजरने या व्हिडिओवर लिहिले 'परफेक्ट सून' तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले , 'कियारा आपल्या सासूसोबत खूप चांगली वागते. याशिवाय काही लोक कियाराला भारतीय बार्बी म्हणत आहेत.

कियारा आणि सिद्धार्थचा विवाह : कियारा आणि सिद्धार्थने ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केले. त्यानंतर त्यांनी बॉलीवूड मित्रांसाठी दिल्लीत आणि मुंबईत एक रिसेप्शन आयोजित केले होते. कियाराच्या लग्नामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आले होते. कियारा अडवाणी वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती राम चरणसोबत 'गेमचेंजर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. Vicky kaushal : 'या' कारणासाठी विक्की कौशलने रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मधून घेतला माघार...
  2. Narayan Murthy video : करीाना कपूरच्या अहंकाराबद्दल नारायण मूर्तींनी सुनावले खडे बोल, व्हिडिओ पुन्हा व्हायरल
  3. viral 'diamond' ring : तमन्ना भाटियाने उलगडले दोन कोटी किंमतीच्या 'हिऱ्या'च्या अंगठीचे रहस्य

ABOUT THE AUTHOR

...view details