महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kiara Advani with her mom : कियारा अडवाणी आहे तिच्या आईची कार्बन कॉपी, पाहा फोटो - कियारा आणि सिद्धार्थसोबत पोज देताना

अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्य काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून अनेक युजर्सना कियारा ही आईची कार्बन कॉपी असल्याचे वाटत आहे.

आईसोबत कियारा अडवाणी
आईसोबत कियारा अडवाणी

By

Published : Feb 23, 2023, 10:43 AM IST

आईसोबत कियारा अडवाणी

मुंबई - नवविवाहित कियारा अडवाणीने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्य अत्यंत गोड शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर कियाराने आईसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही खूप छान दिसत असून तिने फोटोला सुंदर कॅप्शनही दिली आहे. कियाराने लिहिलंय, माझी काळजी घेणाऱ्या, माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या माझ्या मम्माला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझी मुलगी होण्याने मी धन्य पावली आहे.

मायलेकींच्या जोडीने अनुभवलेले संस्मरणीय क्षण फोटोत-कियाराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या आईसोबत घालवलेले आयुष्यातील अनेक आनंदाचे प्रसंग तिने शेअर केले आहेत. अलिकडेच पार पडलेलेल्या कियाराच्या विवाह समारंभातील हळदीपासून ते संगीत समारंभापर्यंच्या फोटोत मायलेकींच्या जोडीने अनुभवलेले संस्मरणीय क्षण फोटोत टिपले आहेत. एका फोटोत, कियारा तिच्या आईला मागून अलगद मिठी मारत असून तिची आई गालाचे चुंबन घेताना दिसत आहे. दुसर्‍या फोटोत कियाराची आई तिच्या लग्नाच्या दिवशी गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात तिच्यासोबत जुळी असल्यासारखी दिसत आहे. आणखी एका फोटोत अडवाणी कुटुंब त्यांच्या हळदी समारंभात कियारा आणि सिद्धार्थसोबत पोज देताना दिसत आहे.

कियारा ही तिच्या आईची कार्बन कॉपीकियारा ही तिच्या आईची कार्बन कॉपी असल्याचे या छायाचित्रांवरून स्पष्ट होते. खरं तर, अनेक नेटिझन्सनी कमेंट्स टाकल्या की कियारा तिच्या आईच्या प्रतिकृतीसारखी दिसते. 'तिची आई खूप सुंदर आहे. कियारा तिच्या कार्बन कॉपीसारखी दिसते,' अशी एक कमेंट सोशल मीडिया युजरने केली आहे. खूपच सुंदर फोटो असल्याचे, एकाने लिहिलंय. डिझायनर मनीष मल्होत्रा ज्याने लग्नाच्या सोहळ्यासाठी कुटुंबाच्या जोड्यांची रचना केली, त्यानेही कियाराच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'जन्मदिनाच्या शुभेच्छा.'

सिद्धार्थ आणि कियाराचा विवाह हा गेल्या काही आठवड्यापासून सर्वात जास्त चर्चित विषय ठरला होता. विवाह पार पडेपर्यंत दोघांनीही याला पुष्टी दिली नव्हती. अत्यंत गोपनियपणे या लग्नसोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. राजस्थानमध्ये विवाह होणार असल्यामुळे खूप आधीपासूनच सर्व लगीनगाई सुरू झाली होती. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी, त्यांच्या येण्या जाण्याची राहण्याची शाही व्यवस्था इथंपासून ते हळदी, संगीत आणि इतर विवाह प्रसंगी कोण सेलेब्रिटी कोणती वस्त्रे परिधान करणार इथंपर्यंतचे नियोजन आखण्यात आले होते. त्याबरहुकुम अंमलबजावणी झाली आणि सिद्धार्थ आणि कियारा यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये एका इंटिमेट सोहळ्यात लग्नगाठ बांधली. त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईक पै पाहुणे आणि मित्रांसाठी दिल्लीत आणि नंतर 12 फेब्रुवारीला मुंबईत फिल्म इंडस्ट्रीतील लोकांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे उघडपणे प्रेमात पडले होते.

हेही वाचा -Rakhi Sawant Came To Mysore Court : हिंदू असल्यामुळे आदिलचे वडील मला स्वीकारत नाहीत राखी सावंत

ABOUT THE AUTHOR

...view details