महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'खो गए हम कहाँ'चं ट्रेलर रिलीज - kho gaye hum kahan

Kho Gaye Hum Kahan : अभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्या 'खो गये हम कहाँ' चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट तीन मित्रांवर आधारित आहे.

Kho Gaye Hum Kahan
खो गये हम कहाँ

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 12:29 PM IST

मुंबई - Kho Gaye Hum Kahan :अभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांचा 'खो गये हम कहाँ' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 26 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अर्जुन वारिन सिंग दिग्दर्शित 'खो गये हम कहाँ' हा चित्रपट तीन मित्रांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिन्ही मित्र डिजिटल दुनियेत हरवलेले दिसतात. 'खो गये हम कहाँ'च्या ट्रेलरमध्ये रोमान्ससोबतच खूप भावनिक ड्रामाही पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये आदर्श गौरव, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी व्यतिरिक्त, कल्की कोचलिन, अन्या सिंग, रोहन गुरबक्सानी, विजय मौर्य, दिव्या जगदाळे, राहुल वोहरा आणि सुचित्रा पिल्लई यांच्याही भूमिका आहेत.

'खो गये हम कहाँ'चं ट्रेलर : 'खो गये हम कहाँ'च्या ट्रेलरमध्ये अनन्या पांडे फोटो क्लिक करताना दिसत आहे. यानंतर सिद्धांत चतुर्वेदी स्टँडअप कॉमेडी करताना दिसत आहे. याशिवाय आदर्श गौरव हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्याचं दाखविले आहे. सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांचा असा विश्वास आहे की हा चित्रपट या पिढीचे भावविश्व प्रतिबिंबित करतो. याबद्दल बोलताना, सिद्धांत चतुर्वेदीनं सांगितलं, ''खो गये हम कहां अनोखेपणे हजारो वर्षांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो. सोशल मीडिया आणि वास्तविक जगातमधील ही एक कहाणी आहे जी सांगणे आवश्यक आहे. एक अशी कहाणी जिच्याशी आमची पिढी मनापासून जोडेल आणि आम्हाला या कहाणीचा एक भाग असल्याचा अभिमान आहे''.

वर्कफ्रंट :अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अनन्या पांडे ही शेवटी 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानासोबत दिसली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. दुसरीकडे सिद्धांत चतुर्वेदी हा शेवटी 'गेहरायान' या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणसोबत दिसला होता. हा चित्रपट 2022मध्ये रिलीज झाला होता. याशिवाय आदर्श गौरव हा 'गन्स अँड गुलाब' या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता दुल्कर सलमान तो दिसला होता. हा चित्रपट खूप चर्चेत होता.

हेही वाचा :

  1. 'टायगर-3'च्या सेटवरील सलमान खान आणि शाहरुख खानचे फोटो व्हायरल
  2. विद्युत जामवालनं हिमालयात साजरा केला वाढदिवस, जंगलामधील टारझनच्या लूकमधील फोटो केला शेअर
  3. प्रतिक्षा संपली! जितेंद्र कुमारच्या 'पंचायत 3' वेब सीरीजचा फर्स्ट लुक केला प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details