मुंबई - Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' चा अंतिम सामना शनिवारी झाला. रोहित शेट्टी हा स्टंट आधारित रिअॅलिटी शो होस्ट करतो. रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 13'चा विजेता ठरला आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धकांनी प्रवेश केला होता. प्रत्येकजण एकमेकांना जोरदार स्पर्धा देत होते. दरम्यान आता डिनो जेम्सने या शोची ट्रॉफी जिंकली आहे. या स्टंट-रिअॅलिटी शोचा प्रीमियर 15 जुलै रोजी झाला. हा शो थरारक स्टंट, भीती आणि काही वादांनी खूप चर्चेत होता. 'खतरों के खिलाडी सीझन 13' शो तीन महिन्यांचा रोलर कोस्टर होता. या शोमध्ये डिनो जेम्स व्यतिरिक्त शिव ठाकरे, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि रश्मीत कौर हे देखील पहिल्या पाचमध्ये स्पर्धकांमध्ये होते. या सर्व स्पर्धकांना पराभूत केल्यानंतर, रॅपर आणि गायक डिनो जेम्सने शोच्या 13व्या सीझनची ट्रॉफी जिंकली.
रोहितने पोस्ट लिहून चाहत्यांचे मानले आभार : ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, अर्चना गौतम, अर्जित तनेजा, डेझी शाह, डिनो जेम्स, नायरा बॅनर्जी, रश्मीत कौर, रोहित रॉय, रुही चतुर्वेदी, शीझान खान, शिव ठाकरे आणि सौंदस मौफकीर या एकूण 14 स्पर्धकांनी सीझन 13 मध्ये भाग घेतला. हा शो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये शूट करण्यात आला. 2 ऑक्टोबर हा 'खतरों के खिलाडी 13' च्या शूटचा शेवटचा दिवस होता. शूट संपल्यानंतर रोहितनं सर्व स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानणारी पोस्ट लिहिली होती. 'खतरों के खिलाडी 13' मध्ये बरेच खतरनाक आणि नवीन स्टंट पाहायला मिळाले. या शोदरम्यान रोहित शेट्टीनं अनेक स्पर्धकांना फटकारले.