रॉकिंग स्टार यश याची जबरदस्त भूमिका असलेला KGF Chapter 2 हा चित्रपट आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाला हिंदी भाषिक पट्ट्यात जबरदस्त प्रतिस्द मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे एसएस राजामौलीच्या RRR च्या हिंदी आवृत्तीचा आगाऊ बुकिंग रेकॉर्ड KGF 2 ने मागे टाकला आहे. रिलीजच्या चार दिवस आधीच चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने आधीच ₹11 कोटी किमतीची तिकिटे विकण्यात यश मिळवले आहे. त्या तुलनेत, RRR च्या हिंदी आवृत्तीने आगाऊ बुकिंगमध्ये फक्त ₹5 कोटींची कमाई केली होती. व्यापार विश्लेषकांच्या मते, कन्नड चित्रपटाने एकट्या उत्तर भारतातील सर्व भाषांमध्ये आगाऊ बुकिंगमध्ये ₹20 कोटींची कमाई केली आहे.
फिल्म ट्रेड अॅनालिसिस प्लॅटफॉर्म इंडियन बॉक्स ऑफिसच्या ट्विटनुसार, चित्रपटाने उत्तर भारतात आधीच ₹20 कोटी किमतीची तिकिटे विकली आहेत, ज्यामध्ये फक्त हिंदी आवृत्तीसाठी ₹11.4 कोटींचा समावेश आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही हिंदी पट्ट्यातील चित्रपटाच्या 'अभूतपूर्व' क्रेझबद्दल ट्विट केले आहे. "KGF 2' चा सकाळी 6 वा. शो होत आहे आणि बरेच काही...#KGF2 चे आगाऊ बुकिंगही अभूतपूर्व. मॉर्निंग शो #मुंबई आणि #पुणे मध्ये सकाळी 6 वाजता सुरू होतील. *निवडक ठिकाणी* तिकिटांच्या किंमती: ₹ 1450 / ₹ 1500 प्रति सीट झाल्या आहेत[ #मुंबई] आणि दिल्ली येथे या तिकीटांचा दर ₹ 1800 / ₹ 2000 प्रति सीट इतका आहे. #तुफान येत आहे," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.