महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Yash And Radhika pandit : साऊथ स्टार यशची पत्नी राधिका पंडितने मुलांसह 'वरमहालक्ष्मी'चा उत्सव केला साजरा.... - राधिका पंडित

साऊथ स्टार यश सध्या आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. आता अलीकडेच त्याच्या घरी 'वरमहलक्ष्मी पूजा' करण्यात आली होती. या पूजेमधील काही फोटो त्याची पत्नी राधिका पंडितने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब पूजा करताना दिसत आहे.

Yash And  Radhika pandit
यश आणि राधिका पंडित

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 7:07 PM IST

मुंबई : 'केजीएफ' स्टार यश सध्या त्याची पत्नी राधिका पंडित आणि मुले आयरा आणि यथर्व यांच्यासोबत आनंदी कौटुंबिक जीवन जगत आहे. अलीकडेच त्याच्या घरी 'वरमहलक्ष्मी पूजा' करण्यात आली होती. दरम्यान आता राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पुजेमधील शेअर केली आहे. हे स्टार कपल पुजेत मुलांसोबत पारंपारिक लूकमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये राधिका आणि यश फुलांनी सजवलेल्या त्यांच्या दिवाणखान्यात देवी लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये यश माता लक्ष्मीची आरती करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो पत्नी आणि मुलांसोबत पोझ देताना दिसत आहे.

राधिका पंडित शेअर केले फोटो :यश आणि राधिका पारंपारिक पोशाख खूप सुंदर दिसत आहे. यशने क्रीम रंगाचे धोतर आणि केशरी बॉर्डर असलेला दुपट्टा घातला, तर राधिकाने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची पारंपारिक साडी घातली आहे. सोन्याचे दागिने, कमी मेकअप आणि केसांमध्ये गजरा घालून राधिकाने तिचा लूक केला आहे. याशिवाय तिची मुलगी आयरा ही लाल लेहेंगा आणि हिरव्या ब्लाउजमध्ये खूप गोड दिसत होती. यशचा मुलगा यथर्व हा वडिलांसोबत क्रीम रंगाच्या धोती आणि लाल रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. हे सुंदर फोटो शेअर करत राधिकाने एक कॅप्शनही लिहिले, 'आशा करतो की तुम्हा सर्वांवर वरमहालक्ष्मीचा आशीर्वाद असावा आणि हा दैवी सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि अनंत समृद्धी घेऊन येवो. शुभ दिवसातील काही संस्मरणीय क्षण शेअर करत आहे'. अशी तिने पोस्टवर लिहले आहे.

दक्षिण भारतात केली जाते पूजा : 'वरमहललक्ष्मी पूजा' हा एक हिंदू सण आहे, जो धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. हा सण प्रामुख्याने दक्षिण भारतातील महिला आणि मुली साजरा करतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे राधिका आणि यश यांचे 9 डिसेंबर 2016 रोजी लग्न झाले होते. या जोडप्याला आयरा आणि यथर्व ही दोन सुंदर मुले आहेत. यश अनेकदा आपल्या कुटुंबासह सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतो. यशची फॅन फॉलोविंग खूप आहे.

हेही वाचा :

  1. Ananya Panday and Aditya Roy Kapur : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर अज्ञातस्थळी रवाना...
  2. Rakhi sawant first umrah video : राखी सावंत त्या व्हिडिओनंतर झाली ट्रोल, प्रेक्षक म्हणाले नाटक...
  3. Dream girl २ movie box office collection day २ :'ड्रीम गर्ल २ ' च्या पुजाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, किती केली कमाई?

ABOUT THE AUTHOR

...view details