मुंबई - Malayalam actor Vinod Thomas Death : मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता विनोद थॉमस यांचे निधन झाले असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. डॉक्टरांनी अभिनेत्याला तपासून मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विनोद यांच्या निधनाच्या वृत्तानं सिनेविश्वातील स्टार्स आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या स्टार्स आणि चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
हॉटेलच्या कारमध्ये पार्किंगमध्ये मृतदेह आढळला : पोलिस सूत्रांनी शनिवारी सांगितलं की हॉटेल व्यवस्थापनानं माहिती दिली की, त्यांच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एक व्यक्ती बराच वेळ उपस्थित आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली आहे. विनोद थॉमस यांच्या शवविच्छेदनाबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. विनोद थॉमस यांच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण कारमधील एसीमधून निघणारा विषारी वायू असू शकतो, असं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, शवविचेच्छदनानंतर याची पुष्टी होईल.