महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

demise of Bishan Singh Bedi : अंगद बेदी, नेहा धुपिया आणि कुटुंबीयांनी बिशन सिंग बेदींच्या निधनानंतर लिहिली हृदयस्पर्शी चिठ्ठी - बिशन सिंग बेदी यांचं निधन

demise of Bishan Singh Bedi : अंगद बेदीनं वडील आणि क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी एक नोट सोशल मीडियावर शेअर केली. अंगदची पत्नी नेहा धुपिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यांनी लिहिलं की बिशन सिंग यांनी दिलेल्या शिकवणीमुळे या कठीण प्रसंगात त्यांना दुःख सावरण्यासाठी दिलासा मिळाला आहे.

demise of Bishan Singh Bedi
बिशन सिंग बेदींच्या निधनानंतर हृदयस्पर्शी चिठ्ठी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 4:07 PM IST

मुंबई - demise of Bishan Singh Bedi : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि उत्कृष्ट फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं. क्रिकेटसह सर्वच थरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आणि कुटुंबीयांचं सांत्वन केलं जातंय. अभिनेता अंगद बेदी आणि त्याची पत्नी पत्नी नेहा धुपियाने त्याच्या कुटुंबीयांच्या वतीनं एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बेदी यांच्या जीवनाबद्दल कौतुक केलं आणि अनेक पिढ्यांसाठी त्यांनी प्रेरणा दिल्याच्या भावना व्यक्त केल्या.

बिशन सिंग बेदी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. अंगदने आपल्या वडिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या वडिलांचे आयुष्य म्हणजे त्यांनी क्रिकेटमध्ये स्पीन केलेल्या चेंडूसारखं होत असं म्हटलंय. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाला खूप दु:ख झाले असताना, बिशनसिंग बेदी यांनी एक निर्भय आणि परिपूर्ण जीवन जगले आणि असंख्य इतरांवर प्रभाव टाकला या ज्ञानाने त्यांना दिलासा मिळाला. त्यांना मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याचे त्यांनी कौतुक केले आणि त्याचे सामर्थ्य, विनोद आणि मोठ्या मनाच्या स्वभावाबद्दल सर्वांचे आभार मानले.

बिशन सिंग बेदी यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बेदी यांनी निर्भय आणि समृद्ध जगण्यासाठी घालून दिलेल्या शिकवणीमुळे या कठीण काळात कुटुंबीय सावरताहेत. त्यांना मिळालेलं प्रेम आणि पाठिंब्याचे त्यांनी कौतुक केलं आणि त्यांचे सामर्थ्य, विनोद आणि मोठ्या मनाच्या स्वभावाबद्दल सांत्वन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. बिशनसिंग बेदी यांचं जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत कसे होते, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना जाणीव होती. कुटुंबाप्रती त्यांची असलेलं प्रेम, भक्ती आणि श्रद्धा, तसेच वाहेगुरुची सेवा यामुळे कुटुंबानेही त्यांचं महानपण कायमसाठी मान्य केलं होतं. त्यांचा असा विश्वास होता की ते निर्भयपणे आणि निःपक्षपातीपणे जगण्याच्या मूल्यांना मूर्त रूप देत असत आणि आजही ते आपल्या प्रिय लोकांसोबत आहेत, असा विश्वास कुंटुंबीयांनी व्यक्त केलाय.

कार्तिक आर्यन, साकिब सलीम, मृणाल ठाकूर, बिपाशा बसू, गुनीत मोंगा यांसारख्या चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनीही या कठीण काळात अंगद, नेहा आणि त्यांच्या कुटुंबीयांना शोकसंदेश पाठवून सांत्वन केलं आहे.

क्रिकेट इतिहासातील एक महान डावखुरा फिरकीपटू म्हणून बिशन सिंग बेदी ओळखले जातात. 1970 च्या दशकात क्रिकेटमध्ये भारतासाठी विजय मिळवून देण्यात त्याच्या फिरकीचा मोठा वाटा होता. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये विजय संपादन करत कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. त्यांनी भारतासाठी एकूण 67 कसोटी खेळले व 28.71 च्या सरासरीने 266 विकेट घेतल्या आणि 656 धावा करत बॅटनेही योगदान दिले.

हेही वाचा -

  1. Bharat Jadhav New Drama Astitva : भरत जाधवचं 'अस्तित्व' नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला ; कधी होणार प्रयोग जाणून घ्या...

2.Happy Birthday Prabhas : क्रिती सेनॉन वाढदिवसानिमित्त दिल्या प्रभासला शुभेच्छा; केली खास पोस्ट शेअर...

3.Kangana Perform Ravan Dahan : कंगना रणौतच्या हस्ते होणारे दिल्लीतील रावण दहन, लव कुश रामलीला समितीचा ऐतिसाहासिक निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details