मुंबई - Katrina Kaif Desi look: कतरिना कैफची गणना बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कतरिनाचा फॅशन सेन्स हा तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. कतरिना जेव्हाही कुठे जाते, तेव्हा ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. कतरिना ड्रेस आणि गाऊनमध्ये जितकी सुंदर दिसते, तितकीच ती एथनिक आउटफिट्समध्येही सुंदर दिसते. दरम्यान आता कतरिना कैफ ही सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे. यावेळी तिनं पिवळ्या प्रिंटेड सलवार परिधान केला होता. या देसी लूकमध्ये ती खूप खास दिसत होती.
कतरिना कैफचा देसी एअरपोर्ट लूक :आज सकाळी कतरिना कैफ एक सुंदर पोशाख परिधान करून मुंबई विमानतळावर पोहोचली. कॅटनं हलका पिवळा कुर्ता सेट घातला होता. तिच्या पिवळ्या ड्रेसवर सुंदर फुलांची प्रिंट होती. यावर तिनं सुंदर जुती घातली होती. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं गडद रंगाचा सनग्लासेस घातलेला होता. यासोबत तिनं केस पोनीटेलमध्ये बांधलेले होते. कतरिनानं या देसी लूकमुळं तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहे. या देसी लूकमधला कॅट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिच्या व्हिडिओवर अनेकजण आता कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.
कतरिनाच्या व्हिडिओवर आल्या कमेंट : कतरिनाच्या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरनं लिहलं, 'खूप खास दिसत आहे' दुसऱ्या एका यूजरनं लिहलं, 'कॅट नेहमीच सुंदर दिसते' आणि आखणी एकानं लिहलं ,ती एकमेव अभिनेत्री आहे जी कोणत्याही दागिन्याशिवाय सुंदर दिसते.' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत, तर काही चाहते कॅटच्या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. कॅटचा हा देसी अंदाज खूप जबरदस्त चाहत्यांना वाटत आहे. कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती पुढं सलमान खानसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित,यशराज फिल्म्सचा हा स्पाय युनिव्हर्समधील हा पाचवा चित्रपट आहे. हा चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस'मध्ये विजय सेतुपतीसोबत झळकणार आहे.
हेही वाचा :
- Satinder Kumar Khosla Death : बिरबल हरपला, ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला काळाच्या पडद्याआड
- Happy birthday Prachi Desai : प्राची देसाईनं चित्रपटसृष्टीत कसं यश मिळवलं, जाणून घ्या तिचा आजवरचा प्रवास
- Haanji song out : भूमी पेडणेकर स्टारर 'थँक्स यू फॉर कमिंग'मधील पहिलं गाणं प्रदर्शित ; पहा व्हिडिओ...