मुंबई - प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा धाकटा भाऊ अभिनेता सनी कौशल आज 28 सप्टेंबर रोजी त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने कुटुंबीय आणि त्याचे मित्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या खास प्रसंगी, सनीची वहिनी आणि बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
'जीते रहो...खुश रहो' - कॅटरिना कैफने पती विकी कौशल आणि दीर सनी कौशलसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि लिहिले, 'जीते रहो...खुश रहो.' या फोटोत कॅटरिना आणि विकीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे.
विकी कौशलने भावाचे केले अभिनंदन - विकी कौशलने धाकटा भाऊ सनी कौशलसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, 'सर्व गुण संपन्न कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप खूप प्रेम.'