मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने ( Katrina Kaif ) वीकेंडला पती विकी कौशलसोबत ( Vicky Kauhsal ) छान फोटो देऊन सुरुवात केली आहे. आपापल्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेले कॅटरिना आणि विकी डिसेंबरमध्ये लग्नानंतर जास्त वेळ एकत्र घालवू शकलेले नाहीत. तथापि, हे जोडपे एकत्र घालवलेल्या छोट्या क्षणांचा आनंद घेण्यास कधीही कमी पडत नाही.
शनिवारी सकाळी कॅटरिनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती विकीसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये, कॅटरिना पूलमध्ये विकीला मिठी मारताना दिसत आहे. पांढरी मोनोकिनी परिधान केलेल्या अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत क्वालिटी घालवला. फोटो शेअर करताना कॅरिनाने लिहिले, "मी आणि माझा," त्यानंतर हार्ट इमोजी तिने टाकला आहे.