महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

katrina kaif shares sizzling pictures : कॅतरिन कैफने शेयर केले मोनोकनीमधील फोटो - मोनोकनी

कतरिना कैफ सध्या शूटिंगसोबतच तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. याशिवाय कतरिना कैफ सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट व्हायला विसरत नाही. कतरिनाने गुरुवारी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती नुकतेच पती विकी कौशलसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीवरून परतली आहे.

katrina kaif
katrina kaif

By

Published : Apr 7, 2022, 6:55 PM IST

हैदराबाद :कतरिना कैफ सध्या शूटिंगसोबतच तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. याशिवाय कतरिना कैफ सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट व्हायला विसरत नाही. कतरिनाने गुरुवारी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती नुकतेच पती विकी कौशलसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीवरून परतली आहे.

याआधी तिने पती विकी कौशलसोबत काही फोटो शेअर केले होते. कतरिनाचे नवे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिसत आहेत.या नवीन फोटोंमध्ये कतरिना अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. ती वाळूवर काळी मोनोकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर बसली आहे. यासोबत तिने आपले केस खुले ठेवले आहेत आणि मोठी काळी टोपी घातली आहे. कतरिनाने हे फोटो शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर आला आहे. स्टनिंग, गॉर्जियस, हॉट अशा कतरिनाच्या फोटोंवर चाहते कमेंट करत आहेत. कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत 'फोनभूत' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कतरिना कैफ 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

हेही वाचा -'Lock Upp' show : लॉकअप शोमध्ये मंदाना करिमी पायल रोहतगीवर आहे 'या' कारणाने नाराज

ABOUT THE AUTHOR

...view details