मुंबई Katrina Kaif : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे सध्या चर्चेत आले आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हे जोडपे जैसलमेरला गेले होते. 3 जानेवारी रोजी म्हणजेच बुधवारी कतरिना कैफनं तिच्या इंस्टाग्राम पेजवर व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती पती विकी कौशलसोबत तिच्या सहलीचा आनंद घेताना दिसत आहे. कतरिनानं शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''तीन सुंदर दिवस. प्रेम, विश्रांती, सूर्यास्त आणि थंडी! नवीन वर्ष साजरे झाले. आता वेळ आहे मेरी ख्रिसमसची.'' कतरिना कैफचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट रुपेरी पडद्याववर रिलीज होत आहे.
कतरिना कैफनं शेअर केले फोटो :कतरिनानं शेअर केलेल्या फोटोबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या फोटोत कतरिना तिच्या केसांशी खेळताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती पती विकी कौशलसोबत सेल्फी काढत आहे. आणखी एका फोटोत हे जोडपं एकत्र सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. याशिवाय शेवटच्या फोटोत कतरिना वाळवंटाच्या मध्यभागी मावळत्या सूर्यासोबत हसत हसत कॅमेऱ्यासाठी पोझ देताना दिसत आहे. जैसलमेरमध्ये नवीन वर्ष साजरे करून कतरिना कैफ आणि विकी कौशल मुंबईत परतले आहेत. या जोडप्याला मुंबईतील विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं.