ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कॅटरिना कैफने साजरा केला आईचा ७० वा वाढदिवस - Katrina wished her mother well

बॉलिवूडची 'बॉर्बी डॉल' कॅटरिना कैफ 5 मे रोजी तिच्या आईचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. याची एक झलक कॅटरिनाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कॅटरिना कैफच्या आईचा वाढदिवस
कॅटरिना कैफच्या आईचा वाढदिवस
author img

By

Published : May 5, 2022, 5:16 PM IST

मुंबई - बॉलिवूडची 'बॉर्बी डॉल' कॅटरिना कैफ 5 मे रोजी तिच्या आईचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. याची एक झलक कॅरिनाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कुटुंबातील पाच बहिणींमध्ये कॅटरिना ही सर्वात मोठी बहीण आहे. कॅटरिना कैफच्या लग्नात तिचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळाले होते.

in article image
कुटुंबासोबत कॅटरिुनाे साजरा केला आईचा वाढदिवस

कॅटरिना कैफने कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत - गुरुवारी कॅटरिना कैफने तिच्या आईसोबत बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो शेअर करून चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम केले. हे फोटो शेअर करत कॅटरिना कैफने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, ''70 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, तू नेहमी आजूबाजूला हसणाऱ्या मुलाबाळांच्यात धैर्याचे आणि आनंदाचे आयुष्य जग."

कॅटरिना कैफच्या आईचा वाढदिवस

अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कॅटरिना कैफ सतत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. कॅटरिनाने तिच्या हनिमूनचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कॅटरिना आणि विकीने वेळोवेळी आपल्या फोटोंनी चाहत्यांना खूश केले आहे.

बहिणीसोबत कॅटरिना कैफ

यापूर्वी कॅटरिना कैफने निळ्या बिकिनीतील फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली होती. कॅटरिनाच्या चाहत्यांनी या फोटोंवर झटपट कमेंट्स केल्या होत्या. या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये कॅटरिना कैफने खूप टाळ्या मिळवल्या.

हेही वाचा -फातिमा सना शेखच्या समर अवताराने घातली चाहत्यांना भुरळ पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details