मुंबई - ''भुल भुलैया 2'' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित शीर्षक ट्रॅक सोमवारी दुपारी प्रदर्शित झाला आहे. या ट्रॅकमध्ये कार्तिक आर्यन उर्फ 'रुह बाबा' सर्वांना भुल भुलैया सांगताना दिसत आहे. नीरज श्रीधर यांनी हे गाणे गायले आहे आणि तनिष्क बागचीने संगीत पुन्हा तयार केले आहे. या गाण्यात अभिनेता कार्तिक आर्यनने केलेला एक नवीन हुक स्टेप पाहायला मिळत आहे.
त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हे गाणे शेअर केले आहे, "रूह बाबासोबत झिगझॅग स्टेप करा !! Bhool Bhulaiyaa2 TITLE TRACK OUT NOW." असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार असला तरी शीर्षक ट्रॅकने आधीच चर्चा निर्माण केली आहे. चाहत्यांनी ज्या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजी ज्या संख्येने टाकल्या आहेत त्यावरुन तर हा ट्रॅक चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते.