मुंबई - बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनने सोमवारी त्याचा आगामी चित्रपट फ्रेडीचा टीझर रिलीज केला. हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टारवर २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल, असे निर्मात्यांनी सोमवारी जाहीर केले. बालाजी टेलीफिल्म्स आणि नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स द्वारे निर्मित, हा चित्रपट एज-ऑफ-द-सीट थ्रिलर आहे. खूबसूरत, वीरे दी वेडिंग आणि प्लॅन ए प्लॅन बी सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या शशांक घोष यांनी फ्रेडीचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात डॉ. फ्रेडी जिनवालाच्या मुख्य भूमिकेत आर्यन झळकणार आहे.
इंस्टाग्रामवर कार्तिकने फ्रेडीचा टीझर शेअर केला आणि लिहिले, "#फ्रेडीच्या जगात आपले स्वागत आहे. अपॉइंटमेंट्स 2 डिसेंबर 2022 रोजी खुल्या आहेत #ReadyForFreddy !!"